अशा प्रकारे आहे कन्या राशीचे प्रेम : नक्की जाणून घ्या संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो कन्या रास हि राशीचक्रातील 6 व्या स्थानावर येणारी रास आहे. ती स्त्री रास आहे. तिचा जो स्वामी आहे तो बुध आहे. सर्व 12 राशींच्या तुलनेत कन्या रास हि चौकस आणि चिकित्सक अशी रास आहे.

प्रत्येक गोष्टीच्या मागे का ? कशासाठी ? कुठे ? कशाला ? हे प्रश्न नेहमीच त्यांना सतावत असतात. तस पाहायला गेलं तर बोलकी अशी हि रास आहे. दुनियादारी कशी करायची हे या राशीला उत्तम प्रकारे माहित असत.

आपली बाजू किंवा आपला मुद्दा समोरच्या व्यक्तीला पटवून देणं हे या राशीच्या व्यक्तींना चांगल्या प्रकारे जमत. यांचं राहणीमान अगदी साधं असत. जास्त फॅशनच्या मागे या राशीचे लोक लागत नाहीत. फॅशनच्या बाबतीत वेगळेपणा करण्याचा या राशीचा काही कल नसतो.

निरीक्षण क्षमता, आकलन क्षमता या राशीच्या लोकांमध्ये फार उत्तम प्रकारे दिसते. या राशीच्या व्यक्तींना समोरच्या व्यक्तीबद्दल माहिती करून घेणे आवडते. मात्र स्वतः बद्दल फारस समोरच्या व्यक्तीला ते सांगत नाहीत.

थोडीशी घाबरट आहे हि रास. म्हणजे पटकन समोरच्या सोबत ओपन होत नाही. पैशाची किंमत या राशींना उत्तम प्रकारे समजते. पैसे कुठे, कधी, किती खर्च करायचे या संदर्भात चांगली माहिती असते.

यांची जी निर्णय क्षमता असते ती थोडी कमजोर असते. सर्व गोष्टींची माहिती असून सुद्धा निर्णय घ्यायची वेळ आली कि थोडं मागे पुढे होतात. झटकन निर्णय घेऊ शकत नाहीत. दुसऱ्या व्यक्तीवर कधीच लगेच विश्वास ठेवत नाहीत या राशीचे लोक.

समोरच्या व्यक्तीबद्दल सर्व काही जाणून घेतल्या नंतर सुद्धा विश्वास ठेवायचा कि नाही याबद्दल त्यांच्या मनात शंकेची पाल चूकचुकत असते. एखाद्या ठिकाणी प्रवासाला जायचं असेल तर त्या ठिकाणा बदल सर्व माहिती काढूनच प्रवास करतात.

या राशीच्या व्यक्तींनी कोणतीही गोष्ट हाती घेतली कि ती गोष्ट अगदी व्यवस्थित रित्या पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत. मित्रांनो व्यवसाय करणं या राशीच्या लोकांना सहसा जमत नाही. कारण व्यवसाय म्हणजे रिस्क आली आणि रिस्क घेणे या राशीच्या तत्वात बसत नाही.

कमिशनचे व्यवसाय, किंवा मार्केटिंग बद्दलचे व्यवसाय या राशींना अतिशय उत्तम प्रकारे जमतात. 12 राशींपैकी हि एक अशी रास आहे जी कमिशचा बिजनेस उत्तम प्रकारे सांभाळू शकते.

मित्रांनो या राशीच्या व्यक्तींना तुम्हाला जर प्रपोज करायचं असेल तर एका वेळेतच काम होणार नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःची एक चांगली इमेज तयार करणे जरुरी आहे. तुमचं वागणं, बोलणं या राशीला पटल तरच ती राशी ठरवेल कि तुमच्या सोबत नातं सुरु करायचं कि नाही ते.

मित्रांनो एकतर हि राशी लवकर विश्वास ठेवत नाही, आणि निर्णय पण झटकन घेत नाही. त्यामुळे बऱ्याचदा तुम्हाला या बाबतीत वाट पहावी लागेल. आणि उशिरा का होईना जर होकार आला तर जशी तुमची आता इमेज आहे तशीच इमेज तुम्हाला त्यांच्या समोर ठेवावी लागेल.

जसे तुम्ही आधी होता तसेच राहणे जरुरी आहे. जर कालांतराने तुमच्या वागण्या बोलण्यात बदल झाला तर हि राशी तुमच्या पासून विलग होण्याची सुद्धा शक्यता असते. या राशीच पैशाचं गणित आहे ते उत्तम प्रकारे दिसून येत.

आपल्या जोडीदाराची खूप जास्त काळजी या राशीचे लोक करतात. तुम्ही जर का या राशीच्या प्रेमात असाल तर तुम्ही कुठे जाता ? काय करता ? काय करणार ? असे बरेच प्रश्नांची उत्तर तुम्हाला देणे जरुरी असेल. या राशीचे लोक एवढे प्रश्न विचारतात याचा अर्थ तुमच्यावर संशय घेते असं नाही.

त्यांना आपण प्रेम करतो त्या व्यक्तीची काळजी घेणे पसंद असते. त्याला तुम्ही संशयाचे नाव देऊन चालणार नाही. तुम्ही जर या राशीच्या प्रेमात असाल तर प्रेमाची पुढची पायरी म्हणजे लग्न. लग्नासाठी या राशीच्या व्यक्ती थोडी घाई करू शकतात. मित्रांनो तुमच्या नात्यात जर भांडण झालं तर या राशीच्या व्यक्तींची माफी मागून काही फरक पडत नसतो.

तुम्ही जी चूक केली आहे त्या बद्दल त्यांना चर्चा हवी असते आणि ती गोष्ट पुन्हा होणार नाही असे कृतीतून त्यांना दिसले पाहिजे. तुम्ही शब्दांचा खेळ करून माफी मागाल तर त्यांच्यावर काहीच परिणाम होणार नाही.

ज्या गोष्टीमुळे चूक झाली त्यात त्यांना सुधारणा दिसणे जरुरी आहे. सुधारणा दिसली तरच त्या व्यक्तीचा राग जातो. तर मित्रानो वर दिलेली माहिती कन्या राशीच्या प्रेमाबद्दल होती. तुमचा पार्टनर सुद्धा कन्या राशीचा असेल तर या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *