असा काळा दोरा कधीच घालू नये काळा दोरा घालणे शुभ की अशुभ

नमस्कार मित्रांनो,

आपण बघतो की कितीतरी तरुण-तरुणींच्या पायामध्ये काळे दोरे बांधलेले दिसतात. आपल्याला वाटते की, तशी फॅशन आहे म्हणून ते बांधतात. काही अंशी ते खरेही आहे व पायामध्ये काळा दोरा दिसायलाही आकर्षक व सुंदर वाटते. आपल्याला हे फॅशन वाटत असेल तरी पायात काळा दोरा बांधण्यामागेही धर्मशास्त्रामध्ये निश्चित अशी काही कारणे दिली आहेत.

धर्मशास्त्रानुसार शनिवारच्या दिवशी शुभ मुहूर्त पाहून काळा दोरा उजव्या पायामध्ये बांधल्यास त्या व्यक्तीच्या घरी लक्ष्मीचे आगमन होते. तसेच त्या व्यक्तीवर देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन त्या व्यक्तीच्या आर्थिक समस्या दूर होतात. म्हणून ज्या व्यक्ती आर्थिक दृष्ट्या कमकुवत असतील ज्यांची आर्थिक स्थिती वाईट असेल त्यांना शनिवारी पायामध्ये काळा दोरा बांधण्यास सांगितले जाते.

यामुळे त्यांच्या आर्थिक समस्या सुटतात, काही व्यक्तींना वारंवार पोट दुखीचा त्रास होत असतो ही पोटदुखी कोणत्याही निश्चित कारणाशिवाय होत असते. म्हणजे त्यामागे कोणतेही कारण नसते. कधीकधी हे दुखणे सहन होणार नाही इतक्या प्रमाणात त्रास होतो.

अशा वेळी उजव्या पायाच्या अंगठ्याला काळा दोरा किंवा इतर कोणत्याही रंगाचा दोरा घट्ट बांधावा यामुळे पोट दुखी कमी होण्यास मदत होते. हा उपाय ॲक्युप्रेशर पद्धतीत मोडतो. म्हणजे यामुळे आपल्या ॲक्युपरेशरचे पॉईंट दाबले जातात व पोट दुखी थांबते. त्यामुळे हा खूपच प्रभावी असा उपाय आहे.

काही महिलांना मासिक पाळीत पोट दुखीचा भयंकर त्रास होतो. त्यासाठी हा उपाय अगदी उत्तम उपाय आहे. ज्यांना पायाला जखम झाली असेल व ती जखम लवकर बरी होत नसेल वेळोवेळी त्याच ठिकाणी काहीतरी लागत असेल व जखम वाढतच चाली असेल तर अशा व्यक्तींनाही काळ्या रंगाचा दोरा बांधण्याचा सल्ला दिला जातो.

लहान मुलांना वाईट नजर लागू नये, दृष्ट लागू नये यासाठी लहान मुले आणि तसेच मोठ्याच्याही पायात काळा दोरा बांधण्याची पद्धत प्राचीन काळापासून आपल्याकडे रूढ आहे. काळा रंग हा शनिदेवांचा आवडता रंग असल्याने शनि महाराजांची आपल्यावर कृपा राहावी यासाठी अनेक लोक आपल्या उजव्या पायात काळा दोरा बांधतात.

काळा दोरा पायाला बांधल्याने त्या व्यक्तीच्या आजूबाजूची न का रा त्म क शक्ती नष्ट होते. पायात काळा धागा बांधायचा असेल तर मंगळवार किंवा शनिवारी हा धागा पायात बांधावा. परंतु तो दोरा पायाला बांधण्याआधी हनुमानाच्या मंदिरात नेऊन त्याची हनुमानाच्या मूर्तीसमोर ठेवून पूजा करावी.

मग हा धागा पायाला बांधावा. म्हणजे याचा अधिक परिणाम जाणवतो. चला तर आपणही काळा धागा पायात बांधून आपल्या जीवनात लक्ष्मीचे आगमन करून घेऊया व आपल्या जीवनातील नकारात्मकता काढून आपले जीवन स का रा त्म क बनवूया.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *