नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करून आजचा पुणे येथे राहणारे शारदा शिवाजी घोरपडे या ताई चा अनुभव सांगायला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ प्रदीपदादा यांना कोटी-कोटी प्रणाम. मी सौभाग्यवती शारदा शिवाजी घोरपडे राहणार पुणे येथे मी आपल्याला माझा अनुभव शेअर करत आहे. दादा मी पुण्यात माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी दाखल झाले होते.
आधीपासून स्वामी विषयी आवड आणि त्यात अनुभव पाहायला भेटले. तशातच अनुराधा पौडवाल यांचा तारक मंत्र आधीपासून पाठ होता. त्यात तालबद्ध ऐकायला भेटला. तेव्हापासून स्वामी सेवेत आणखी ओढ वाटू लागली आणि अशा आनंदी समयी मला केव्हा अचानक कोरोनाने गाठलं समजलच नाही. ती वेळ होती 23 ते 27 मार्च या वेळेत मी खूप घाबरून गेले. आता माझं काही खरं नाही या भीतीने मला जगणं नकोसं झालं.
नको त्या विचाराने डोक्यात थैमान घातले. सारखा स्वामींचा दावा करू लागले. स्वामी मला यातून वाचवा माझ्यानंतर माझ्या मुलांचे कसे होईल. आम्ही दोघंच पुण्यात पप्पा गावी अशा परिस्थितीत मला नेमकं स्वामी प्रकट दिनादिवशी आपण मला आपल्या ग्रुप मध्ये ऍड केले. तो दिवस माझ्यासाठी सुवर्ण दिन होता. मी सर्व कामे आटपून स्वामी पूजा मांडली आणि मनात एक सारखा स्वामींचा दावा चालू होता.
अशात मला अनेक संकटांनी घेरल होतं. पण तुमची साथ आणि स्वामींचा आ शी र्वा द म्हणून मी आज जिवंत आहे. अशा परिस्थितीत भोरला जायचा निर्णय घेतला. पण दोन दिवस होऊन गेले गाडी काही भेटेना. मी तुम्हाला विनंती केली आणि तुम्ही लगेच उत्तर दिलं. ताई टेन्शन घेऊ नका सर्व ठीक होईल आणि लगेच अर्ध्या तासात गाडी दारात हजर आणि मला स्वामींनी मला अलगद घरी आणून सोडले.
पण त्या गडबडीत माझा कान दुखत होता. हे माझ्या लक्षात आले नाही. रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत मला झोप नसे. अशात दादांनी मला तारक मंत्र, कालभैरवअष्ट, हनुमान चालीसा असे मंत्र आणि आरोग्य सेवा दिली आणि दोन ते तीन दिवसातच माझा कान दुखायचं राहिला. दादा माझी आई आजारी असताना आपण मला मोठ्या भावासारखे खूप मोलाची साथ दिली. माझा विश्वास डगमगू दिला नाही. आपण ज्या प्रकारे सांगितला त्या प्रकारे मी आईची सेवा केली.
पण प्रारब्ध लिहिलेले कुणाला चुकत नाही. पण दादा आपणास मी आवर्जून सांगू इच्छितो की, आपण सांगितल्याप्रमाणे मी हॉस्पिटलमध्ये जाऊन माझ्या हाताने माझी स्वतःची काळजी घेऊन आईची सेवा केली. आणि 1 मेपासून 11 मे पर्यंत माझे घर आणि हॉस्पिटल अशी तारेवरची कसरत असताना केवळ आपल्या आशीर्वादाने आणि स्वामी कृपेने मला आणि माझ्या कुटुंबातील सदस्याला कुठल्याही प्रकारे आजपर्यंत कसलाही त्रास झाला नाही.
कारण मी हॉस्पिटलच्या गेटमध्ये शिरतानांच श्री स्वामी समर्थ तुम्हीच माझ्या बरोबर आहात. हा आ त्म वि श्वा स आणि दादांचा आ शी र्वा द यामुळेच मी आज आपल्याला माझा अनुभव शेअर करत आहे. आणि हे केवळ दादा तुमच्या मुळे शक्य झाले. दादा आज मी एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते मला रोज सवय होती आपण जे काही खाऊपिऊ ते पहिले स्वामींना द्यायचे. पण आई 11 मे ला गेल्याने त्यात खंड पडला होता आणि आज अचानक स्वामींनी ते सुरू केलं.
माझ्या नकळत मी कधी स्वामीं पुढे चहा दिला हे मला समजलेच नाही. आपण स्वामींपासून लांब जाण्याचा प्र य त्न केला तरी स्वामी आपली साथ सोडत नाही हे अगदी त्रिवार सत्य आहे. अशीच कृपा आपल्या या लहान बहिणीवर असुदे. ज्या ज्या वेळी माझ्यावर अशी संकटे येतील त्यावेळी मी आपला आणि स्वामींचा धावा करीन आणि माझी स्वामींवर श्रद्धा कधी कमी होऊ देऊ नका श्री स्वामी समर्थ.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.