नमस्कार मित्रांनो,
औदुंबराची म्हणजे उंबराची ही 1 गोष्ट नेहमी जवळ ठेवा. मित्रांनो पैसा आपोआप तुमच्या घरात अचानक यायला सुरुवात होईल. तुमचं नशीब तुम्हाला साथ द्यायला सुरुवात करेल. सुख समाधान सर्वकाही तुम्हाला मिळेल. आपल्या जीवनातून समस्या संपून जातील व माता लक्ष्मीची असीम कृपा आपल्याला प्राप्त होईल.
या उपायामुळे जर का कोणत्या व्यक्तीला बाधा झाली असेल कसलीतरी भीती वाटत असेल तर त्याचे निवारण होईल. ही वस्तू धारण करण्याचे ग्रह दोष निवारण होईल. कर्जमुक्तीच्या अनुषंगाने ही वस्तू धारण केल्यास कर्जातून मुक्ती मिळेल त्याच्या सर्व मनोकामनाची पूर्ती होईल. संतान प्राप्तीसाठी हा उपाय अत्यंत चांगला मानलेला आहे.
तसेच मित्रांनो ही वस्तू घरामध्ये ठेवल्याने घरातील कलह, भांडण तंटे बंद होऊन मानसिक शांतता मिळते. हे सर्व चमत्कारिक फायदे औदुंबर वृक्षाचे आहेत. मग अशी कोणती गोष्ट औदुंबर वृक्षामध्ये जे धारण केल्याने आपल्याला हे लाभ मिळतात. आज आपण औदुंबर वृक्षाच्या अशा गोष्टींबद्दल पाहणार आहोत की, जी वस्तू आपण धारण केल्याने आपली अडलेली सर्व कामे त्वरित व्हायला लागतील.
चला तर मित्रांनो जाणून घेऊया या उपायांविषयी. मित्रांनो पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपु राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी भगवान नरसिंह अवतार घेतला होता. जेव्हा हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारले की, कुठे आहे तुझा देव तेव्हा प्रल्हाद म्हणाला की, देव चराचरामध्ये आहे.
हे ऐकून हिरण्यकश्यपूने तिथे असणाऱ्या औदुंबर लाकडाच्या खांबाला लाथ मारली आणि त्याक्षणी येतो खांब फोडून नरसिंह भगवान प्रकट झाले आणि त्यांनी हिरण्यकश्यपूला त्यांच्या राजवाड्यात चौकटीवर दाबून धरून त्यांनी त्याच पोट फाडल. परंतु हिरण्यकश्यपूच्या पोटात असणाऱ्या कालीन कुंड विषामुळे भगवान नरसिंह यांच्या नखांमध्ये प्रचंड दाहक व्हायला लागले.
त्यावेळी माता लक्ष्मीनी तिथेच जवळ असणाऱ्या औदुंबर वृक्षाची फळे आणून भगवान श्री नरसिंहना त्यांची नखे त्या फळामध्ये खुपसायला लावले. औदुंबर वृक्षाच्या फळातील रसामुळे भगवान नरसिंह यांच्या नखातील विष थांबले व त्यांनी प्रसन्न होऊन औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला की, माझा व माता लक्ष्मीचा वास सदैव औदुंबर वृक्षामध्ये असेल.
मित्रांनो याचप्रमाणे नरसिंहसरस्वती महाराज हे देखील भगवान नरसिंहाचे अवतार आहेत व त्यांनी जेव्हा अवतारकार्यमध्ये पंचगंगा कृष्णा संगमावर अमरापूर या गावी वास्तव्य केले तेव्हा संगमावरील औदुंबर वृक्षाखाली बसून तप करायचे. तिथे तप करताना 64 योगी त्यांच्या पूजनासाठी त्या झाडाखाली येत असत.
जेव्हा नरसिंह सरस्वती यांची अमरापूर सोडण्याचा निश्चय केला तेव्हा त्या 64 योगिनी महाराजांना विनंती केली की, त्यांनी इथून जाऊ नये. त्यावेळी नरसिंह सरस्वतीनी सांगितले की, काळजी करू नका. मी सदैव या औदुंबर वृक्षांमध्ये माझा वास या औदुंबर वृक्षामध्य कायम राहील. आपण जेव्हाही माझे नाव घ्याल मला आठवाल तेव्हा मी तुम्हाला दर्शन देईन.
या औदुंबर वृक्षांमध्ये भगवान नरसिंह व माता लक्ष्मी यांचा वास असतोच. त्याचबरोबर भगवान नरसिंह अवतार असणारे नरसिंह सरस्वती महाराज यांचाही वास असतो. तसेच मित्रांनो औदुंबर वृक्ष हा शुक्र ग्रहाचा कारक मानला जातो. शुक्र ग्रह हा साधनसंपत्ती व ऐश्वर्य यांचा कारक असतो. ज्या व्यक्तींचा सूर्यग्रह मजबूत असतो त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये धन ऐश्वर्य संपत्ती यांची कधीही कमतरता भासत नाही.
मित्रांनो आपल्याला करायचे काय आहे तर आपण हा उपाय कोणत्याही शुभ मुहूर्तावर शुक्रवारी किंवा गुरुपुष्यामृत या मुहूर्तावर करू शकतो. आपण जेव्हा हा उपाय करणार असाल तर त्यांच्या एक दिवस आधी औदुंबर वृक्षाजवळ जाऊन प्रार्थना करायची आहे म्हणजे समजा आपण हा उपाय शुक्रवारी करणार असाल तर गुरूवारच्या दिवशी आपण औदुंबर वृक्षाजवळ जाऊन त्याला थोडेसे पिवळे तांदूळ अर्पण करावेत.
असे पिवळे तांदूळ, पिवळे फुल आणि पाणी अर्पण करावे व मनोभावे प्रार्थना करावी की, मी आपले मूळ नेण्यासाठी उद्या येत आहे तर आपण कृपा करून माझ्या सोबत घ्यावे आणि मला आम्हाला कृपाआशीर्वाद द्यावा. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून औदुंबराचे मूळ घरी आणावे. त्या मुळाचा अगदी छोटासा तुकडा कापून आणावा.
मूळ घेऊन आल्यावर या मुळाला गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने साफ करावे. त्यानंतर हे मूळ आपल्या देवघरामध्ये किंवा एखाद्या पाटावर पिवळे वस्त्र हंथरुण त्याच्यावर थोडी चण्याची डाळ ठेवावी व या चण्याच्या डाळीवर हे मूळ ठेवून त्याची विधिवत पूजा करावी. पूजा करून झाल्यावर या मुळाला मनोभावे प्रार्थना करावी.
की, जी काही आपली अडलेली काम असतील, गृहदोष असतील, संतान प्राप्तीच्या इच्छा असतील, कर्जमुक्ती पाहिजे असेल अशी प्रार्थना करायची आहे. नंतर तुम्ही हे मूळ आपल्याला देवघरात ठेवू इच्छितात किंवा एखाद्या चांदीच्या किंवा स्टीलच्या डब्यामध्ये कुंकू घालून या कुंकुवामध्ये हे मूळ घालून ठेवावेत.
दररोज नित्य नियमाने याची पूजा करावी. या उपायांमुळे आपली इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होईल. माता लक्ष्मीची कृपा बरसेल, घरात पैसे यायला लागतील. या उपायामुळे घरात जबरदस्त असे परिवर्तन होईल आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.