आंघोळ न करता स्वयंपाक बनवत असाल तर नक्की पहा, विचारही केला नसेल अशा गोष्टी घडतात.

नमस्कार मित्रांनो,

स्वयंपाक घर हे एक मंदिर आहे. म्हणून आपण मंदिर जसे स्वच्छ व शुद्ध ठेवतो त्याप्रमाणे आपले स्वयंपाक घर शुद्ध व स्वच्छ ठेवावे. कारण स्वयंपाक घरातच देवी अन्नपूर्णा वास्तव्य करते. जर आपण स्वयंपाक घर स्वच्छ ठेवले, त्याचे पावित्र्य राखले तरच देवी अन्नपूर्णा तेथे थांबते. नाही तर देवी अन्नपूर्णा अशा घरातून निघून जाते.

ज्या घरामध्ये देवी अन्नपूर्णेच्या वास असतो अशा घरात कधीही अन्नधान्याची कमतरता राहत नाही. अशा घरात नेहमी बरकत राहते आणि जर देवी अन्नपूर्णा आपल्यावर नाराज होऊन घरातून निघून गेली की, आपल्या घरात बरकत राहत नाही. आपल्याला अन्न पाण्यासाठी ही तरसावे लागते. म्हणून देवी अन्नपूर्णेचा नेहमी आदर करा.

हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आपले स्वयंपाक घर स्वच्छ, शुद्ध व पवित्र ठेवू. काही स्त्रियांना सकाळी उठल्यानंतर लगेचच चहा पिण्याची सवय असते. मग त्यात स्नान न करता तशाच स्वयंपाक घरात जातात आणि चहा बनवतात. स्वतःही तसा चहा घेतात आणि घरातील इतर सदस्यांनाही देतात.

परंतु यामुळे घरात अशुद्धी पसरते. सकाळी पतीला, मुलांना टिफिन द्यायचे असतात घाई असते असे म्हणून बहुतेक स्त्रिया सकाळी स्नान न करता तशाच स्वयंपाकाला सुरुवात करतात. स्वयंपाक झाला सर्वांचे टिफिन दिले की, आरामात आंघोळ करतात.

परंतु यामुळे तुम्ही जे अन्न बनवले आहे त्यात अशुद्धी मिसळले जाते. त्याचे पावित्र राहत नाही आणि तेच अन्न खाऊन आपले मनही अशुद्ध होते आणि यामुळेच घरात दारिद्र्य व आजारपण यायला सुरुवात होते. म्हणून स्वयंपाक घरात प्रवेश करण्यापूर्वी सर्वात आधी स्नान करावे. स्वयंपाक घर झाडून पुसून स्वच्छ करावे.

किचन कट्टा पुसून घ्यावा, गॅसची शेगडी स्वच्छ करावी. देवी अन्नपूर्णेला नमस्कार करून त्यानंतरच गॅस चालू करावा. आता तुम्ही म्हणाल की, आम्ही तर रात्री किचन साफ केले होते मग सकाळी कशासाठी स्वच्छ करायचे? परंतु रात्री 11 ते 3 पर्यंत संपूर्ण वातावरणात नकारात्मकता पसरलेली असते. ती नकारात्मकता आपल्या स्वयंपाक घरातही असते.

जी आपल्या किचनच्या ओटीवर, गॅसच्या शेगडीवरही पसरलेली असते. ती नकारात्मकता काढून टाकण्यासाठी सर्वांत आधी किचनची सफाई करावे आणि त्यानंतरच स्वयंपाकाला सुरुवात करावी. तसेच अन्न हे पूर्णब्रह्म आहे असे आपण म्हणतो. तो भगवंतांचा प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो तर हा प्रसाद पवित्र शरीराने तसेच शुद्ध वातावरणात केला तरच त्याचे लाभ आपल्या शरीराला मिळतात.

आपले स्वयंपाक घर नेहमी स्वच्छ ठेवावे. काही स्त्रियांना रात्रीची उष्टी खरकटे भांडे तसेच किचनवर जमा करून ठेवण्याची सवय असते. त्या सकाळी उठल्या मग ते भांडे स्वच्छ करतात. परंतु हे खुप चुकीचे आहे. उष्ठे खरकटे भांडे कधीही किचनवर तसेच पडू देऊ नये. कारण यामुळे आजारांना निमंत्रण मिळते.

उष्ठ्या खरकट्या भांड्यांवर खूप जीव जंतू व किटाणू पटकन निर्माण होतात. त्या आपल्या किचनचे वातावरण दूषित करतात. पर्यायाने आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण भांडे स्वच्छ करून किचनची व्यवस्थित स्वच्छता करावी.

जर आपल्याकडे कामवाली मावशी येणार असेल तरीही किचनवर तशीच उष्टी खरकटी भांडी जमा करून ठेवू नये. सर्व भांडे पाण्याने मिसळून त्यातील खरकटे बाजूला काढून टाकून द्यावे आणि ती भांडे बाहेर किंवा गॅलरी ठेवावी. किचनमध्ये तशीच पडू देऊ नये. स्वयंपाक झाला की, सर्वात आधी भगवंतांना नैवेद्य अर्पण करावा आणि त्यानंतरच आपण जेवण करावे.

आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण स्नान करून स्वयंपाक करतो. कारण स्नान करून स्वयंपाक केला तरच आपण भगवंतांना नैवेद्य अर्पण करू शकतो आणि भगवंतांना नैवेद्य अर्पण केला तर आपल्या घरातील अन्न हे अन्न न राहता भगवंतांचा प्रसाद बनते आणि आपण प्रसाद खाल्याप्रमाणे होते.

घरातील सर्वांना अशी सवय लावावी की, स्नान केल्याशिवाय किचनमध्ये प्रवेश करू नये. म्हणजे आपल्या स्वयंपाक घराचे पावित्र्य राखले जाईल आणि देवी अन्नपूर्णा आपल्यावर प्रसन्न होऊन देवीचे वास्तव्य कायम आपल्या घरात राहून घरात बरकत राहील. कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *