अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी येईल बाळंतपणाचा हा अनुभव ऐकून…एक सत्य अनुभव

नमस्कार मित्रांनो,

ब्र म्हां ड ना य क जय जय श्री स्वामी समर्थ यशोदा मामी प्र त्ये क कामात असताना त्यांचे स्वामींचे नामस्मरण चालूच असे. आज भल्या पहाटेपासून त्यांनी गुरुचरित्राचे वाचन देखील केले होते आणि नामाचा जप तर अ खं ड चालू होते. अण्णा मामांच्या घराला देवधर्म हा काही नवीन नव्हता. दहा-बारा वर्षांपूर्वी मामाने मामीना अक्कलकोटला नेले होते.

तेव्हापासून मामींना स्वामींची ओढ लागली ती लागली. यशोदा मम्मी म्हणजे अख्ख्या गावाच्या मामीच. गोल भरलेला चेहरा, नाकी डोळी मीटस, उजळलेल्या सावळा रंग, अंगावरची नऊवारी साडी आणि कपाळावर आठ आन्या येवढे कुंकू. मामी आणि मामांचे प्रसन्न व्य क्ति म त्त्व अख्ख्या गावाला माहिती होते.
सकाळपासून किंबहूना काल रात्री पासूनच मामी जरा अ स्व स्थ होत्या.

गेले दोन दिवस कधी नव्हे असा मुसळधार पाऊस चालू होता. बर पावसाचं काही नाही पण घरात अवघडलेली सून शांता सरकारी दवाखान्यातल्या नर्स येऊन गेल्या आणि म्हणाल्या की, इथे उपकेंद्रात बाळत होण्यासारखे दिसत नाही. कारण बाळ फिरलेले दिसते तालुक्याला न्यावे लागेल. तेव्हापासून मामीचा डोळ्याला डोळा लागला नव्हता. कारण शांताचे दिवस भरलेले होते कालपासून गावाबाहेचा ओढा तुडुंब वाहत होता.

इकडचा माणूस तिकडे आणि तिकडचा कुणी इकडे येत नव्हता. गाडीची व्यवस्था झाली होती पण जाणार कसे? वरून शांताला आज सकाळपासूनच दुखायला लागले होते. तिला कळा यायला लागल्या होत्या. इकडे मामा देखील चिंतेत होते. मुलगा काल पलीकडे गावाला गेलेला होता. तो तिकडेच अडकलेला आणि त्यात सूनबाईंचे भरलेले दिवस.

त्यांनी गाडीची सोय देखील केली पण पलीकडे जाणार कोण?अस्वस्थ मामा वाड्यात येरझाऱ्या घालत होते. एकमेव उपाय म्हणून मामीनी गावातल्या एका जुन्या सोयणीला निरोप धाडला होता. भल्या पहाटे पांडू निरोप घेऊन गेला होता पण ती जागेवर नव्हती. तर आजूबाजूला आले की, ताबडतोब पाठवून द्या असे सांगून तो देखील बिचारा परत आला होता. त्यात शांताच्या कळा वाढायला लागल्या होत्या.

मामीने दहा-बारा वर्षांपूर्वी एकदा काही सुविधा नसल्याने आपल्या मुलीचे घरीच बाळंतपण केले होते. पण आज ती स्थिती नव्हती त्यावेळी सगळी बाळतपण घरीच व्हायची आता वयानी थरथरणाऱ्या हातांना का बाळंतपण करणे जमणार होते तरी देखील त्या खंबीर बाईंनी सगळी तयारी करून ठेवली होती.

सुती कपडे, गरम पाणी आणि नाळ कापायला कोरे ब्लेड पान देखील. माझ्या स्वामींनी वेळ आणली तर त्यांच्यावर भार सोपवून ती सगळे करणार होती. देवाचा धावा करत सुनेच्या खोलीच्या बाहेर अस्वस्तपणे फिरत होते. त्यांनी पुन्हा एकदा पांडूला बघून यायला सांगितले काही वेळात पांडू देखील हात हलवत परत आला.

कुणी आहेत का घरात बाहेरून एका बाईचा आवाज आला. रमा सुई आली म्हणून मामी आनंदाने बाहेर पळाल्या. पण बाहेर दुसरीच कोणी तरी होती. एखाद्या घरंदाज घरातील वाटावी आणि चेहरा चंदनासारखा नितळ. मामींनी तिला विचारले तर ती म्हणाली रमा आजीनी पाठवले आहे. म्हातारपणी त्यांच्यापेक्षा हे काम मी चांगलं करीन म्हणून मामीचा जीव आता भांड्यात पडला.

त्यांनी आनंदाने तिला पायावर पाणी घ्यायला लावून घरात घेतले. मामीने सगळी पूर्वतयारी आधीच करून ठेवली होती. आता मामा मामी दोघांनाही आहेसे असे वाटले होते. बराच वेळ शांताचा ओरडण्याचा आवाज बाहेर येत होता पण त्यापाठोपाठ लहानग्याचा ठयाहो ठयाहो असा आवाज वाड्यात घुमला. तसे मामा खुर्चीवर बसले. मामींना काय करू आणि काय नाही असे झाले होते.

बाळ फिरलेले होते पण सुईंनी डॉक्टराना जमणार नाही अशा पद्धतीने बाळंतपण केले होते. बाहेर येत मामींनी गोड बातमी मामांना दिली. बाळ आणि शांता दोघेही सुखरूप आहेत असे सांगितले. सगळं काही व्य व स्थि त करून ती सुई निघाली. तेव्हा मामींनीच चहा टाकला आणि म्हणाल्या तुला कधी गावात नाही पाहिले तेव्हा ती म्हणाली मी राजश्री रमा आजीच्या लांबच्या नात्यातली.

चहानंतर मामीनी ओटी भरू असे म्हटल्या पण तिने नंतर येते म्हणून सांगितले आणि निघून गेली. मामी तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहातच होत्या दिवस मावळतीला आला होता. आणि दुपारपासून पाऊस कमी झाला होता बाळकृष्ण आता छान झोपला होता. मामाचा मुलगा रमा सुईणीला गाडीवर टाकून गडबडीने आलेला होता. बायकोला कळा येत आहेत हे त्याला कळले होते आणि उशीर नको म्हणून ओढ्याचे पाणी जरा कमी झाले.

तसे त्याने पलीकडेच अडकलेल्या सुईणीला गाडीवर बसवले आणि लगबगीने घरी पोहचला. सगळ्यांचे हसत चेहरे बघून त्यालाही हायसे वाटले. मामीने सगळी गोष्ट सांगितले तेव्हा म्हातारी रमा सुई म्हणाले. अहो काय सांगू मामी मी ओढ्याच्या पल्याड होते कशी येणार होते. आणि तुम्ही म्हणता तसे कोण बाय नाय बाय. माझ्या नात्यात अन पाहुनीही तर कोण आलेली नाही.

मामा आणि मामी एकमेकांकडे पाहतच राहिले. पांडू सुद्धा मनाला जेव्हा तो गेला तेव्हा घर साफ बंद होते आणि कोणी बी नव्हतं मामी लगेच पळाल्या आणि स्वामींपुढे साखर ठेवली आणि म्हणाल्या महाराज भक्तांसाठी तुम्ही अन्नपूर्णा देवीचे रूप घेतले होते. आज पुन्हा सुईच रूप घेऊन तुम्ही माझ्या सुनेला सोडवलीत.

माझ्या नातवाचे मोठे भाग्यच म्हणावे लागेल की, जन्मताच स्वामींचे हात त्याला लागले. चिंब भिजलेल्या डोळ्यांनी मामी अनेक तास स्वामींच्या समोरच बसून होत्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *