नमस्कार मित्रांनो,
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे, हे तर तुम्ही ऐकलंच असेल. असं म्हणण्यामागे कारण आहे. अंड्याचे आपल्या आरोग्यासाठी असलेले फायदे. यामुळेच डॉक्टर देखील आपल्याला अंड खाण्याचा सल्ला देतात.
प्रथिनेयुक्त अंडी केवळ आपले स्नायूच मजबूत करत नाहीत ,तर हृदयाच्या कार्यास देखील मदत करतात. अंडी ही नाश्त्यात खाण्याची उत्तम गोष्ट आहे. ज्यामुळे तुम्ही उकडलेले अंडे खाऊ शकता किंवा त्यापासून ऑम्लेट बनवू शकता.
असे अनेक लोक आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारे अंड्याचे सेवन करतात, परंतु तुम्हाला माहितीय का की, अंड हे सगळ्याच गोष्टींसोबत खाऊ नये. नाहीतर शरीरासाठी उपयोगी असलेले अंड तुमच्या शरीराचं नुकसान देखील करु शकतं. चला जाणून घेऊया कोणत्या पदार्थांसह आपण अंडी कधीही खाऊ नये.
1) भाजलेलं मांस आणि अंडी
अनेक ठिकाणी अंडी आणि भाजलेले मांस खाल्ले जाते. या दोन्हीमध्ये भरपूर प्रथिने आणि चरबी असल्याने, ते सुस्तीचे कारण बनू शकते.
2) साखर आणि अंडी
जर तुम्ही साखरेसोबत अंडी वापरण्याचा विचार करत असाल, तर त्याचे दुष्परिणाम देखील जाणून घ्या. वास्तविक, जेव्हा या दोन गोष्टी एकत्र शिजवल्या जातात, तेव्हा त्यातून बाहेर पडणारे अमिनो अॅसिड शरीरासाठी विषारी बनते, ज्यामुळे रक्तातील गुठळ्या होण्याची समस्या वाढू शकते.
3) सोया दूध आणि अंडी
अनेक जिममध्ये जाणारे लोक अंड्यांसह सोया दूध पितात. तुम्हाला माहीत आहे का. सोया मिल्कसोबत अंडी खाल्ल्याने आपल्या शरीरातील प्रथिने शोषण्याची प्रक्रिया विस्कळीत होते.
4) चहा आणि अंडं
जगभरात अनेक ठिकाणी चहासोबत नाष्टा म्हणून अंडी खाल्ली जातात. कदाचित तुम्हाला माहित नसेल की, परंतु चहासोबत अंडी मिसळल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या आरोग्याला आणखी हानी पोहोचते.
5) दुधाच्या वस्तू आणि अंडी
इतरही अनेक गोष्टी आहेत ज्यांच्यासोबत अंडी कधीही खाऊ नयेत. विशेषत: खरबूजांसह अंडी कधीही खाऊ नका. तसेच बीन्स, चीज, दूध किंवा त्यापासून बनवलेल्या कोणत्याही गोष्टीसोबत अंडी खाणे टाळावे. यामुळे देखील तुमच्या शरीराला धोका आहे.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.