नमस्कार मित्रांनो,
कार्तिक शुद्ध द्वितीया हा दिवस यमद्वितीया म्हणून साजरा केली जाते. या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला अगत्यपूर्वक जेवायला बोलावले होते अशी पौराणिक कथा आहे. म्हणून या दिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी भाऊ बहिणीकडून ओवाळून घेत असतो.
आणि भाऊ बहिणीला प्रेमाचे प्रतिक म्हणून काहीतरी गिफ्ट देत असतो. काहीतरी भेटवस्तू देत असतो किंवा पैसे देत असतो. जर काही कारणामुळे बहिणीला भाऊ भेटला नाही तर या दिवशी बहीण चंद्राचे देखील भाऊ म्हणून ओवाळणी करू शकते. भावा बहिणीला एकमेकांची आठवण रहावी, विचारपूस करावी, एकमेकांवर प्रेम करावे यासाठी हा सण साजरा केला.
अजून 1 गोष्ट ही गोष्ट कमी लोकांना माहित असेल भाऊबीजेच्या दिवशी जर कोणाला मरण आले असेल तर त्याला मोक्ष मिळतो असे देखील मानले जाते. आज आहे 6 नोव्हेंबर 2021 शनिवार भाऊबीज हा सण साजरा करणार आहोत. भाऊबीज या सणाचे महत्त्व तसेच भाऊबीज आपल्याला का साजरी करायची आहे यासंबंधी आपण माहिती बघणार आहोत. त्यामुळे ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा.
भाऊबीजेच्या दिवशी मी तुम्हाला त्यामागची कथा काय आहे नक्की का साजरा करायचा असतो हे सांगणार आहे. कारण आपण जे पण काही सण साजरे करतो त्या प्रत्येक सण साजरा करण्यामागे एक कथा देखील असते. त्यामुळे आज भाऊबीज साजरा करण्यामागची कथा काय आहे हे मी तुम्हाला सांगत आहे. एक दिवस यमाने आपल्या दूतांना आज्ञा केली ज्याला आजवर कोणीही शिवी दिली नाही अशा माणसाला घेऊन या.
यमाचे दूत अशा माणसाचा शोध घेत निघाले. एका बहिणीला ही बातमी कळाली. तिच्या भावाला आजपर्यंत कोणी शिवी दिली नव्हती हे तिला माहीत होते. आता आपल्या भावाचे रक्षण केले पाहिजे म्हणून त्याला शिव्या देते रस्त्याने फिरू लागली आणि त्याच्या घरी गेली. हिला बहुतेक वेड लागले आहे असे माहेरच्या माणसांना वाटले.
मग तिने खरा प्रकार सांगितला सर्वांना आनंद झाला. आपले प्राण बहिणीने वाचवले म्हणून भावाने बहिणीला ओवाळणी घातली. तो दिवस होता कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणून या दिवसाला यमद्वितीया किंवा भाऊबीज असेही म्हटले जाते. भावा-बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकांवर प्रेम करावे यासाठी हा सण आहे.
बहिणीकडे जावे तिला वस्त्र अलंकार द्यावेत आणि तिच्या घरी भोजन करावे सख्खी बहिण नसली तर एखाद्या मानलेल्या बहिणीकडे जेवावे बहिणीला भाऊ नसेल तर तिने चंद्राला ओवाळावे. या दिवशी यमुनेत स्नान करणे पुण्यकारक मानले जाते. त्यानिमित्त यात्राही भरते. या दिवशी यमुनेबरोबर यमाचीही पूजा करतात. असा हा भावा बहिणीच्या प्रेमाचा सण म्हणजे भाऊबीज.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.