अगदी घराजवळच स्वामींचा मठ असावा अशी स्वामींजवळ इच्छा व्यक्त करणाऱ्या निस्सीम स्वामीभक्ताचा अनुभव

नमस्कार मित्रांनो,

स्वामी महाराजांसमोर करुणा भाकली तर अडीअडचणींचा परिहार होतो असा आज वरचा सर्वांचाच अनुभव आहे. श्री स्वामी महाराज हे भक्ती भावाचे भुकेले आहेत. सारे भक्त त्यांच्यासाठी सारखेच आहेत. स्वामी प्रिय भक्तहो आज मी तुम्हाला स्वामी भक्त उर्मिला जोगळेकर यांना आलेला स्वामींचा अवधूत अनुभव मी तुम्हाला इथे कथन करून सांगणार आहे. साधारण 1994 – 95 व्ये वर्षे असेल. आम्ही तेव्हा पुणे येथे राहत होतो.

मला तेव्हा स्वामींबद्दल काहीच माहिती नव्हती. एक दिवस बाहेर गेलो असताना पुण्याच्या सारसबागेत जवळील स्वामींच्या मठात जाणे झाले. पण त्यावेळेस मला तो मठ स्वामींचा आहे हे माहीत नव्हते. मी नमस्कार केला आणि मनात विचार केला की, असा एखादा मठ घराजवळ असेल तर काय बरे होईल. तिथे एक गृहस्थ बसलेले होते.

त्यांनी मला एक फोटो प्रसाद म्हणून दिला. तो हातात घेतला तेव्हा त्यावर लिहिले होते फोटोच्या वरच्या भागात श्री स्वामी समर्थ व फोटोच्या खाली भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा मला समजले की, हे अक्कलकोटचे स्वामी आहेत. मी तो फोटो घेऊन घरी आले. तेव्हा तो फोटो तसाच कपाटात ठेऊन दिला. त्यानंतर सहा महिन्यातच ह्यांनी पुण्याचा जॉब सोडला व चिपळूणच्या एका कंपनीत जॉब पकडला.

आम्ही पुणे सोडून सर्वजण चिपळूणला गेलो. घराच्या नंतर दोन बंगले सोडून स्वामींचा मठ होता. पहिल्यांदाच स्वामींचे प्र त्यं त र आले. स्वामींनी मला घराच्या जवळ मठ दिला. तरी सुद्धा मी रोज मठात जात नव्हते. अधून मधून जात होते. पण मठाचे जे मठाधिपती केळकर आजोबा होते त्यांचा परिचय झाला होता. एक वर्ष झाले व अचानक यांना चिपळूणचा जॉब सोडावा लागला. हे परत पुण्याला जाऊ असे म्हणू लागले.

पण मला परत पुण्याला जायचे नव्हते. कारण इथे आल्यावर माझ्या मुलाचे एक वर्ष वाया गेले होते. परत वर्ष वाया घालवायचे नव्हते. मी खुपच अस्वस्थ व खचून गेले होते व डिप्रेशनमध्ये गेले होते. पण एक दिवस मठात गेले असताना मी माझी सर्व परिस्थिती केळकर आजोबांना सांगितली. त्यांनी मला मार्ग दाखवला व सांगितले की, हा जो माझा देव आहे त्याचे नाव समर्थ आहे. तो अ श क्य गोष्ट शक्य करून दाखवतो. तू तुझे मागणे त्याच्याकडे माग व सहा लाख जपाचा सं क ल्प कर.

जप सहा अक्षरी आहे. श्री स्वामी समर्थ म्हणून सहा लाख म्हणजे तो सिद्ध होतो व हा दोन महिन्याच्या आत पूर्ण कर मी तिथल्या तिथे संकल्प केला. तो दिवस होता जानेवारीच्या महिन्यातला पहिला आठवडा. मी जप करावयास सुरुवात केली. मी वेड्यासारखा जप केला. माझा जप 18 मार्चला पूर्ण झाला. जप करत असताना मला फक्त स्वामी दिसत होते. ते माझा जप पूर्ण करून घेतील असा विश्वासही करत असे. हळूहळू माझा आत्मविश्वास व स्वामींवरील श्रद्धा वाढीस लागेल व ह्यांना 24 मार्चला मी ज्या कंपनीत ह्यांना नोकरी लागू दे असे सांगितले होते, त्या कंपनीत नोकरी चांगल्या पोस्टवर लागली.

मी ज्या कंपनीचे नाव सांगितले होते, ती एक मेकॅनिकल कंपनी होती. हे मेकॅनिकल इंजिनिअर होते. चिपळूणला सर्व केमिकल कंपन्या होत्या. ही एकच इंजीनियरिंग कंपनी होती. मध्येच जप करताना माझी स्वामींनी अनेक वेळा परीक्षा बघितली. पण प्र त्ये क परीक्षेनंतर माझी श्रद्धा वाढतच राहील व आत्मविश्वास वाढत गेला. त्यामुळे मी चिपळूणमध्येच राहून माझ्या मुलाचे शालेय शिक्षण पूर्ण करू शकले. पुढे दहा वर्ष मी स्वामींच्या मठात रोज जात राहून स्वामींची सेवा करत राहिली.

स्वामींनी मला जवळ घेतले. त्यानंतर आम्ही पुण्यात आलो आता आम्ही सर्वजण स्वामींचे रोज जप करून सेवा करतो. माझा मुलगा व माझे मिस्टरही सेवा व जप करतात. आयुष्यात अनेक छोट्या-मोठ्या प्रसंगात सतत स्वामी जवळ आहेत अशी आम्हाला नेहमीच प्रचिती येते. अशीच स्वामींनी माझ्याकडून व आम्हा सर्वांकडून आयुष्यभर सेवा करून घ्यावी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *