नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रि वा र वंदन करून आज मी तुम्हाला एका स्वामींच्या भक्ताची कथा सांगणार आहे. स्वामी भक्तांनी ही स्वामींची कथा नक्की ऐकायला हवी. नारायण नावाचा एक मोठा सरकारी अधिकारी होता. तो मनापासून स्वामी भक्ती करत होता. त्याची पत्नी आई मुलगा धा र्मि क होते. परंतु त्यांची स्वामींवर श्रद्धा नव्हती. स्वामी म्हणजे मनुष्य आहे तो काही देव नाही आणि आपण त्यांना देव म्हणू शकत नाही असे त्यांचे मत होते.
एके दिवशी नारायण स्वामींच्या दर्शनाला येतो. आ शी र्वा द घेऊन परतत असताना त्याच्या लक्षात येते स्वामींना भेट म्हणून आणलेली शाल स्वामींना द्यायचीच राहिली. त्यामुळे परत स्वामींकडे जाण्यासाठी निघतो पण त्याला वाटेत गौराबाई भेटतात आणि गौराबाई म्हणजे दुसऱ्या सुंदराबाई. बाई म्हणतात तू जा इथून शाल स्वामींना मी देते. गौराबाई नारायणाकडून शाल घेतात पण स्वामींना शाल काही देत नाही.
एके दिवशी नारायणाला सरकारी कामानिमित्त अपरात्री बाहेरगावी जायचं असतं. नारायणाची आई आज किंक्रांत आहे म्हणून त्याला जाण्यापासून थांबवत असते. तरी नारायण म्हणतो स्वामींच्या सेवकांना कशाचीच भीती नाही असे म्हणून बाहेरगावी जायला निघतो. अक्कलकोटला तिकडे स्वामी थंडीने कुडकुडत असतात. समोर शेकोटी असते भुजंगा चोळप्पा स्वामींना घोंगडी आणून देतात परंतु स्वामी ते घोंगडी पांघरून घेत नाहीत. थोड्या वेळात गौराबाई तिथे येतात. तिला पाहून स्वामी नारायण यांनी दिलेल्या शालेबद्दल विचारतात.
गौराबाई निमूटपणे स्वामींना शाल आणून देते. तिकडे नारायणाला रस्त्यात 2 चोर अडवतात आणि त्याला मारहाण करून त्याच्याकडून गाठोडी हिसकावून घेतात. नारायण रक्तबंबाळ होऊन धरतीवर कोसळतो. पण कसा बसा सावरतो आणि स्वामींचा धावा करु लागतो. या ठिकाणीच काही अंतरावरून दोन पोलीस जात असतात. तो नारायण त्यांना म्हणतो मला दवाखान्यात न्या मला खूप दुखापत झाली आहे असे सांगतो.
त्यावेळी ते पोलीस आम्हाला वेळ नाही असे सांगून पुढे निघून जातात. पुढे गेल्यावर त्यांना एक हिंदू वृद्ध भेटतो आणि सूचना देतो तरीही पोलीस आपल्या वाटेने चालत जातात. काही अंतर गेल्यावर त्यांना प्र त्य क्ष स्वामी येऊन ही सूचना देतात. तरीही पोलीस त्याकडे दु र्ल क्ष करतात. पण काही वेळातच स्वामींचे तेज रुबाब पाहून पोलिसांना नाही म्हणता येत नाही. ते दुखापत झालेल्या नारायणाला मदत करायला परत येतात.
पाहिल्याबरोबरच पोलीस अधिकारी त्यांना लगेच ओळखतात. आणि घरी आणून सोडतात आणि वैद्यकीय उपचार करण्यात येतो. हे सगळं पाहून त्यांच्या घरच्या म्हणतात की, स्वामी स्वामी करून काय मिळालं किंक्रांतीच्या दिवशी नको जाऊ म्हटलं होतं तरीही गेलास काय केलं स्वामींनी. पण नारायण स्वामींची भक्ती करणे सोडत नाही. काही दिवसांनी तोच पोलीसआधीकारी नारायणाचे हालहवाल विचारायला नारायणाच्या घरी येतो.
नारायण त्यावेळी त्याला विचारतो तुम्हाला मला दुखापत झाली ही सूचना कोणी दिली? त्यावर पोलीस म्हणतो आम्हाला एका वृद्ध माणसाने ही सूचना दिली. नारायण विचार करतो की, त्या दिवशी अपरात्री इतक्या रात्रीच्या वेळी मला कोणी बरे पाहिले असावे? नक्कीच स्वामींनी काहीतरी केले असेल तो आपल्या मुलाकडून स्वामींचे चित्र मागवतो आणि पोलिसांना दाखवतो. पोलीस अधिकारी म्हणतो हेच ते वृद्ध मनुष्य.
नारायणाला गहिवरून येतं त्याला आणि त्याच्या घरच्यांना सुद्धा कळतं. स्वामी कृपेचे प्रचिती येते पण तरीही त्यांना प्रश्न पडतो. स्वामी जवळ होते तर त्यांनी अपघात का घडवून आणला? तेव्हा स्वामी प्रकट होतात. स्वामी म्हणतात अरे तुम्हाला काय वाटलं आम्ही मनुष्य आहे म्हणून काहीच करू शकणार नाही का? भगवंताला कोणत्याही रूपात भक्ताची मदत करायची असते.
आम्हाला नियती बदलता येत नाही. परंतु त्यातून भक्ताची सुटका कशी करावी याचे धोरण आम्ही ठरवतो. अरे खुद्द प्रभू श्रीरामांना सुद्धा आपला वनवास चुकवता आला नाही. स्वतःच्या कर्माचे फळ असते ते चुकवता येत नाही. परंतु त्यातून आपल्या भक्तांना कसे सोडवावे यावर सद्गुरूंचा कायम लक्ष असतं. हे ऐकून सर्वांना आपली चूक कळते आणि नंतर सर्व जण स्वामींचा जय जयकार करतात. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.