नमस्कार मित्रांनो,
आज पुन्हा एकदा नवीन अनुभव घेऊन मी तुमच्यासमोर आलेली आहे. स्वामी भक्तांनो तुम्ही स्वामींचे अनुभवांना खूप जास्त प्रेम देत आहात आणि असंच इथून पुढे देत राहाल असा माझा विश्वास आहे. आजचा अनुभव राहुल दादांचा आहे. दादांचा अनुभव त्यांच्याच शब्दात आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे. श्री स्वामी समर्थ नमस्कार मी राहुल 31 वर्षाचा आहे. साधारणपणे चार वर्षांपूर्वी माझं लग्न झालं.
वयाच्या 27 व्या वर्षी जशी सगळी मुले असतात तसाच मी ही होतो. देवधर्म वैगेरे नमला काही कळत नव्हतं. लग्नाआधी देवधर्मात मी जास्त काही केले नाही. घरामध्ये देखील मला कोणी जास्त फोर्स केला ही नाही. पण लग्न झाले आणि सगळ्या गोष्टी बदलायला सुरुवात झाली. माझी पत्नीही स्वामी भक्त ती नेहमी मुंबईमधल्या चिंचपोकळी येथील मठात जायची. जेव्हा आमचे लग्न ठरलेले होते आणि त्या आधीच्या त्या दिवसांमध्ये ती मला सुद्धा चिंचपोकळीमधल्या मठात घेऊन गेली होती.
लग्नाच्या वेळी मी नोकरीला नव्हतो. श्रद्धाने त्यावेळी तिने स्वामींना माझ्या नोकरीचे साकडे घातले. माझा विश्वास तेव्हाही नव्हता पण सरळ बोलणार कसे ना. कारण त्यावेळी आम्ही एकमेकांना समजावून घेत होतो. पण माझा विश्वास तेव्हा बसायला सुरुवात झाला जेव्हा तिची प्रार्थना फळास आली आणि मला अगदी जशी हवी तशी आणि जिथे हवी तिथे अशी उत्तम नोकरी मिळाली.
हा माझा आलेला पहिला अनुभव आहे. मग मला क्षणोक्षणी स्वामींचा अनुभव येत गेला. असे अनेक लहान मोठे प्रसंग आहेत जिथे मी स्वामींना साकडे घातले. त्या वेळी स्वामी माझ्यासाठी धावून आले. प्र त्ये क वेळेस असे होते असे नाही कितीतरी वेळा गोष्टी माझ्या मनासारखे घडल्या नाहीत. प्रत्येक वेळी गोष्टी आपल्या मनासारख्या घडायला इतक्या आपण लायक आहोत का? आपण कधीच काही चूक केली नाही का? हा विचार देखील आपण केला पाहिजे.
मग ते प्रारब्ध आपल्यासाठी लिहिलेले आहेत ते होणारच पण स्वामी त्या प्रारब्ध स्वीकारण सोपं बनवतात. त्या गोष्टींचा इतका त्रास आपल्याला होत नाही. ही घटना घडून गेली आणि ती वेळ निघून गेल्यानंतर लक्षात यायचं ते झालं किंवा जे नाही झालं ते माझ्या चांगल्यासाठीच होतं. माझ्यासाठी जे योग्य आहे तेच स्वामींनी घडवून आणलं. मी माझ्या कमी बुद्धीप्रमाणे स्वामींची नित्य सेवा सुरू केली. नोकरीमध्ये माझी बढती झाली बायकोला दिवस गेले व जुळी मुले आहेत असं कळलं.
सर्व अगदी छान सुरू होते. नुकतेच एका विशेष दिवशी बायकोला कळा सुरू झाल्या. तिचा प्रस्तुती काळ अजून बराच दूर होता. दोन्ही मुलांना त्यांच्या नैसर्गिक जन्माच्या आधीच बाहेर काढावे लागलं. मुले जगतील याची डॉक्टरांना खात्री नव्हती. डॉक्टरांनी तसे आधीच आम्हाला सांगितले होते. पण स्वामी कृपेने दोन्ही मुलं रडत बाहेर आली. मुलं आता लहान बाळांच्या आयसीयूमध्ये आहेत.
तिथल्याही डॉक्टरांना मुलं कितपत तग धरतील याबद्दल शंका आहे. परंतु ही मुलं स्वामींचीच देणं आहेत. जे योग्य आहे तेच स्वामी करणार याची मला खात्री आहे. जे काही होईल ती स्वामींची आज्ञा असणार. स्वामी भक्तांनो आपण राहुल दादांच्या जुळ्या मुलांसाठी स्वामी चरणी जरूर प्रार्थना करू. राहुल दादांसाठी आपण कमेंट मध्ये स्वामींच्या मंत्राचा जयघोष करावा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा महिमा संबंध जगभरात गाजवा ही आपणा सर्वांची कामना आहे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.