नमस्कार मित्रांनो,
जातीभेद, धर्मभेद आणि वर्णभेद मोठ्या प्रमाणामध्ये मानला जाणारा तो काळ. तो काळ होता 1970 चा आणि अशा काळामध्ये आपल्या जातीपेक्षा, आपल्या धर्मापेक्षा, उच्च वर्गीय समजल्या जाणाऱ्या जातीय धर्मातील मुली
सोबत आंतरजातीय प्रेमविवाह करणं म्हणजे अतिशय कठीण आणि अवघड गोष्ट.
मात्र ही अवघड गोष्ट साध्य करून दाखवली सुशीलकुमार शिंदे यांनी आणि महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे 1970 ला सुशीलकुमार शिंदे यांचा उज्वला वैद्य यांच्यासोबत आंतरजातीय प्रेमविवाह अगदी 51 रुपयात संपन्न झाला.
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे बालपण आणि राजकारणाच्या पूर्वीचा जीवन प्रवास बराचसा खडतर होता. सोलापूरच्या न्यायालयामध्ये शिपाई म्हणून काम करत असलेले सुशीलकुमार शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
ही त्यांची संघर्षाची कहाणी जेवढी रंजक आहे ते तेवढीच रंजक आहे त्यांच्या आंतरजातीय प्रेमविवाहाची कहाणी.
सुशीलकुमार शिंदे जेव्हा मुंबईला फौजदार होते तेव्हा त्यांची वैद्य कुटुंबीयांशी ओळख झाली. त्यांचा मित्र सुभाष विळेकर यांच्यामुळे झालेली ही ओळख.
सुभाष विळेकर यांचा भाऊ म्हणजे वैद्य कुटूंबाचा जावई.
त्यामुळे मित्रांसोबत वैद्य कुटूंबाकडे सुशीलकुमार शिंदे याचं अधूनमधून जाण येन होत असायचं. सुशीलकुमार शिंदे सांगतात की, असच त्यांच्या घरी गेलो असताना उज्वलाची आणि माझी नजरानजर झाली.
आणि पहिल्याच नजरेमध्ये ते उज्वला वैद्य त्यांच्या प्रेमामध्ये पडले. मात्र सुशीलकुमार शिंदे यांच्या घरीसुद्धा त्यांच्या लग्नाचा विषय सुरू होता. घरच्यांनी 1 मुलगी बघितली आणि समाजाच्या बंधनामुळे त्यांचा साखरपुडा देखील पार पडला.
आता जिच्यावर सुशीलकुमार शिंदे प्रेम करत होते तिच्याशी विवाह होणं जवळपास अशक्य वाटत होतं. मात्र
नियतीचा खेळ फार वेगळाच होता. ज्या मुलींशी सुशीलकुमार शिंदे यांचा साखरपुडा झाला त्या मुलीचं साखरपुडा झाल्यानंतर 3 महिन्यामध्ये निधन झालं.
जेव्हा साखरपुडा झाला तेव्हासुद्धा सुशीलकुमार शिंदे अगदी द्विधा मनःस्थितीमध्ये होते. जेव्हा साखरपुडा झाल्यानंतर तेव्हा मुलीचं निधन झालं आता आपण अविवाहितच रहावं अस सुशीलकुमार शिंदे यांचा विचार होता.
आता सुशीलकुमार शिंदे मुंबईत होते. मुंबईत तेव्हा डबल डेकर बस होत्या. अगदी तुरळक गर्दी असलेल्या डबल डेकर बसमध्ये सुशीलकुमार शिंदे आणि उज्वला वैद्य यांची भेट झाली आणि त्यांच्या प्रेमाला नवीन पालवी फुटत गेली.
आणि त्यानंतर दोघांनी आयुष्य एकत्रित जगण्याचा निर्णय घेतला. 1 मे 1970 रोजी म्हणजे महाराष्ट्र दिन या जोडीच लग्न झालं आणि ते ही अवघ्या 51 रुपयांमध्ये. दोघेही पूरोगामी विचाराचे आणि त्यामुळं तिथीपेक्षा महाराष्ट्र दिन
लग्न करण्याचा दोघांनीही एकत्रितपणे निर्णय घेतला.
आणि 51 रुपयांमध्ये मुंबईच्या श्रीमंगल कार्यालयामध्ये नोंदणीबद्ध सुशीलकुमार शिंदे आणि उज्वला वैद्य याचं
आंतरजातीय प्रेमविवाह पार पडला. सुशीलकुमार शिंदे सांगतात की, आंतरजातीय प्रेमविवाह टिकवून ठेवण हे दोघांवरही अवलंबून असते.
आणि यामध्ये त्यांच्या अर्धांगिनीची पूर्ण साथ मिळाली. तो काळ फार कठीण होता आणि जातीची बंधने विचित्र होती आणि अशा काळात आंतरजातीय प्रेमविवाह म्हणजे खूप मोठं पाऊल होत. मात्र त्यांच्या पत्नीने त्यांना दिलेली साथ ही कौतुकास्पद होती असे सुशीलकुमार शिंदे म्हणतात.
वैद्य कुटूंबातील सुरुवातीला प्रेमविवाहाला विरोध झाला. मात्र पुढच्या काळामध्ये सुशीलकुमार शिंदे यांचा स्वभाव आणि वागणं आणि त्याचं बोलणं बगून त्यांनी या विवाहाला मान्यता दिली. या जोडप्याला घरी बोलवलं आणि त्यांच्यावरही अक्षता ही टाकल्या.
विवाह झाल्यानंतर नवविवाहित जोडपं सुशीलकुमार शिंदे
यांच्या घरी सोलापूरला गेले. तिथलं वातावरण उज्वला वैद्य
यांच्या मनामध्ये चलबिचल करणार होत. मात्र त्यांनी सगळ्यांशी जुळवून घेतलं. तरी सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे ना फ्रीज होत, ना गॅस होत, ना कुकर होता.
पंचपक्वानाचा स्वयंपाक करण्याची संस्कृती घेऊन आलेल्या उज्वला वैद्य यांनी मात्र पाच ये सहा महिन्यात सुशीलकुमार शिंदे यांच्या कुटूंबाशी जुळवून घेलतं. अस सुशीलकुमार शिंदे आपल्याला सांगतात. हा किस्सा होता सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रेमविवाहाचा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या नक्की शेअर करा.
अशाच आणखी महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळण्यासाठी आत्ता आपल्या वायरल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.