नमस्कार मित्रांनो,
लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे म्हणजेच दिवाळीचा खास दिवस. 4 नोव्हेंबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी पूजा करतांना स्वस्तिक पूजन सुद्धा केले जाते. सुख-समृद्धीसाठी, बिझनेस चांगला चालावा, धंदा चांगला चालावा, नोकरीमध्ये प्रगती व्हावी, घरात धनधान्याची कमी व्हायला नको म्हणून लक्ष्मीपूजनासोबत स्वस्तिक पूजन सुद्धा केले जाते.
आता स्वस्तिक पूजन का करावे? तर मित्रांनो स्वस्तिक हे सुखाचे समृद्धीचे आणि शांतीचे प्रतीक आहे. म्हणून आपण घराच्या बाहेर किंवा घराच्या आत किंवा देवघरात स्वस्तिक काढत असतो. मित्रांनो स्वस्तिक काढल्याने घरात शांतता येते न का रा त्म क ऊर्जा कमी होते आणि व्यापारी ठिकाणी स्वस्तिक काढले तर तिथे प्रगती होते.
तर मित्रांनो तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी असच स्वस्तिक काढून त्याची पूजा करायची आहे. मित्रांनो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही पाठावर लाल कुंकूवाने स्वस्तिक काढू शकता. किंवा देवघरातच जमिनीवर सुद्धा स्वस्तिक काढू शकता. किंवा पांढरे कापड घेऊन त्यावर लाल कुंकवाने स्वस्तिक काढू शकता. म्हणजे कुंकूवामध्ये थोडे पाणी टाकायचे त्याला ओल करायचं त्याने स्वस्तिक काढायचं.
मित्रांनो स्वस्तिक काढून झाल्यावर त्यावर लाल कुंकू आणि हळद फूल अक्षता टाकून त्याची पूजा करावी. नंतर दिवा लावावा अगरबत्ती ओवाळावी अशा रीतीने लक्ष्मी पुजनासोबत तुम्ही स्वस्तिक पूजन करू शकता. आणि ते स्वस्तिक काढल्यावर त्या स्वस्तिकावर तुम्ही दागदागिने ठेवावे, पैसे ठेवावे अन्य जे ही तुम्ही लक्ष्मीपूजनाची पूजा करताना ठेवत असाल ते सगळ ठेवावं.
आणि त्याची पूजा करावी आणि कापडावर जर तुम्ही स्वस्तिक काढले असतील तर ते कापड तुमचे दुकान असेल तर दुकानातल्या गल्यात ठेवावे किंवा घराच्या तिजोरीत तुम्ही ठेवू शकता. मित्रांनो अशापध्दतीने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्वस्तिक पुजन अवश्य करावी तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.