4 डिसेंबर शनिश्र्चरी अमावस्या गुपचूप लावा इथे तेलाचा 1 दिवा बाधा अडचणी समस्या होतील दूर, पैसा इतका येईल की…

नमस्कार मित्रांनो,

4 डिसेंबर शनिवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे कार्तिक अमावस्या. या वर्षीची कार्तिक अमावस्या शनिवारी आल्याने या अमावस्येस शनिश्र्चरी अमावस्या असंही म्हटलं जाईल. शनिश्र्चरी अमावस्येस जर आपल्या घराच्या जवळपास शनिदेवांच मंदिर असेल तर ते तिथे जाऊन आपण शनिदेवांच दर्शन नक्की घ्या आणि त्यांना तेल नक्की वाहा. मात्र हे दर्शन घेताना शनिदेवांच्या डोळ्यात पाहण्याची चूक करू नका.

विशेष करून जी नवीन पिढी आहे त्यांना या बाबतीत ते अज्ञानी आहे त्यांना माहित नाहीये. कारण शनिदेवांच्या डोळ्यात पाहून त्यांचा दर्शन घेतल्यास शनीची साडेसाती शनीची दह्या म्हणजे अडीचकी पाठीमागे लागण्याची दाट शक्यता असते. कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे शनी दोष उदभवतात आणि म्हणून शनिदेवांच दर्शन हे नेहमी मान खाली घालून आपण घ्यायचं असतं. मित्रांनो अमावस्या तिथीचा प्रारंभ आदल्या दिवशी म्हणजेच 3 डिसेंबर शुक्रवारी सायंकाळी 04:56 मिनिटांनी होत आहे आणि या अमावस्याची समाप्ती 4 डिसेंबरच्या शनिवारी दुपारी 01:13 मिनिटांनी होईल.

जरी ही अमावस्या दुपारी समाप्त होत असली तरी सुद्धा सूर्योदय व्यापिनी ही अमावस्या तिथी असल्याने संपूर्ण दिवस आणि रात्र सुद्धा ही अमावस्याच मानली जाणार आहे. याचदिवशी 2021 सालातील शेवटचे सूर्यग्रहण सुद्धा असेल, जरी हे सूर्यग्रहण भारतातून दिसत नसले तरी सुद्धा गर्भवती महिलांनी थोडीफार काळजी या बाबतीत नक्की घ्या. आज आपण या अमावस्या तिथीस करावयाचे काही अत्यंत प्रभावशाली असे उपाय पाहणार आहोत की, ज्यामुळे आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती लाभेल.

ज्यांच्या कुंडलीत शनि दोष आहे मग शनीची साडेसाती असेल, दह्या म्हणजे अडीचकी असेल अंतर्दशा महादशा असेल या सर्व शनि दोषांपासून राहू आणि केतू दोषांपासून मुक्ती मिळेल. आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतील आणि पितरांच्या कृपाशीर्वादाने घराची आपल्या घराण्याची भरभराट नक्की होईल. मित्रांनो हे उपाय सांगण्यापूर्वी सुरुवात करण्यापूर्वी यांनी छोट्या छोट्या गोष्टी सांगू इच्छितो की, आपल्या घराच्या जवळपास जे कोणी गोरगरीब असतील गरजू असतील अशा लोकांना या शनिश्र्चरी अमावस्येच्या निमित्ताने आपण अन्नदान, जलदान वस्त्रदान हे नक्की करा.

खूप शुभ फळे त्यामुळे प्राप्त होतात. सोबतच त्या दिवशी आपल्या घराच्या जवळपास गो माता म्हणजे गाय असेल, कुत्रा, कावळा किंवा कोणत्याही प्रकारच्या पशु पक्षांना आपण अन्नदान नक्की करू शकता. गाईला घरातली पहिली भाकरी किंवा चपाती विशेष करून गाईसाठी बनवा. आपण जर व्रत उपवास करताय तर गाईसाठी ती मुद्दामून बनवा. शेवटची चपाती किंवा भाकरी ही कुत्र्यासाठी आपण राखून ठेवा. कावळ्याला पशु पक्षांना दाणे टाकल्याने सुद्धा जीवनातील अनेक बाधा अनेक अडचणी दूर होतात.

जे विद्यार्थी आहेत ज्यांच्या करिअरमध्येअडचणी आहेत अशा लोकांनी करिअरमध्ये किंवा व्यवसायामध्ये यश मिळण्यासाठी आजच्या दिवशी गोरगरिबांना ब्लांकेट्स म्हणजे थंडीपासून रक्षण होण्यासाठी जे पांघरायचे कपडे असतात, उनी कपडे यांचे दान नक्की करा. सोबतच आपण जे उपाय पाहणार आहोत हे उपाय करताना, अनेकजण उपाय करतात पण त्याच फळ त्यांना मिळत नाही. याचं कारण हे छोटे छोटे नियम आपण पाळायचे आहेत की, आणि त्यावेळी मांसाहार करू नये म्हणजे कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये.

कोणत्याही पशूंची हत्या करणं, हिंसा करणं शक्यतो ब्रह्मचर्याचे पालन करा. कोणत्याही गरीबाचा अपमान करू नका. लोखंडी वस्तूंची खरेदी आपण या दिवशी करायची नाहीये. लोखंडी वस्तू खरेदी करू नका. कोणताही स्मशानभूमी जवळून शक्यतो आपण जाऊ नका. कारण अमावस्या तिथीस न का रा त्म क शक्तींचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो आणि या न का रा त्म क शक्ती वरदान आहे की, अमावस्या तिथीस प्रत्यक्ष परमेश्वर यांना अभय देतो.

शक्यतो या दिवशी आपण लवकर उठा सूर्योदयापूर्वी उठा. कोणावरही रागवू नका, क्रोध करू नका, लोभ करू नका आणि ज्यांना शक्य आहे जवळपासच्या शिवमंदिरात जाऊन भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती आपल्या घरातलं तांब्याभर जल हे नक्की अर्पण करा. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय आणि महिलांनी नमः शिवाय ओम शिवाय नमः ओम या मंत्राचा जप करा. मित्रांनो सुरुवात करूया की, या शनिश्र्चरी अमावस्येस आपण नक्की कोण कोणते उपाय करावेत.

सुरुवात करूया दोषांपासून जर शनीची साडेसाती आहे दह्या आहे म्हणजे अडीचकी आहे, अंतर्दशा महादशा आणि कोणत्याही प्रकारचा शनी दोष दूर करण्यासाठी आपण या शनिश्र्चरी अमावस्येस शनिदेवांच निमित्त काही वस्तूंच दान नक्की करा. विशेष करून छायादानाच मोठ महात्म्य आहे. छाया म्हणजे काय तर एका स्टीलच्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये आपण मोहरीचे तेल किंवा सरसों का तेल हिंदीत म्हणतात. ते मोहरीचे तेल घ्यायचा आहे त्या तेलात आपण स्वतःचे छाया पहा,

स्वतःचा चेहरा पहा ज्याच्या जीवनात शनि दोष आहे त्यांनी स्वतःचा चेहरा पाहून हे मोहरीच तेल त्या वाटीसहित एखाद्या गोरगरिबाला दान द्यायचा आहे. यालाच छाया दान अस म्हणतात. जर कोणीही हे तेल स्वीकारीत नसेल तर आपण जवळपासच्या शनी मंदिरात हे तेल वाटीसहित निघून ठेवू शकता. यामुळे शनि दोषापासून मुक्ती मिळते. सोबतच मित्रांनो जीवनातील अनेक प्रकारच्या अडचणी समस्या बाधा दूर करण्यासाठी आपण एका काळ्या रंगाच्या कपड्यात शाबूत उडीद घ्यावीत. म्हणजे उडीद डाळ नव्हे म्हणजे शाबूत उडीद असतात.

शाबूत म्हणजे न फुटलेले तुटलेले असे उडीद घ्यावेत. आणि त्यामध्ये एक रुपयाचा किंवा पाच रुपयाचा, दहा रुपयाचा सिक्का ठेवावा आणि त्या काळ्या कापडाची पोटली करावी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी रात्री स्वतःच्या उशीखाली ठेवून झोपी जावं. शनिवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण कोणत्याही पिपळाच्या वृक्षाखाली ही काळ्या रंगाची पोटली ठेवून या यामुळे सुद्धा शनि दोष कमी होतात. शनीच्या समस्यापासून मुक्ती मिळते आणि जीवनातील अडचणी बाधा सुद्धा दूर होतात.

आपल्या घराच्या जवळपास जर पिंपळाचे झाड असेल बेलाचे झाड असेल किंवा वडाचे झाड असेल किंवा जर हे तिन्ही झाड असतील तर या पवित्र वृक्षांखाली या शनिश्र्चरी अमावस्येस आपण एक छोटीशी वस्तू ठेवून या. कोणत्याही मातीचा पात्र मग मातीचे दिवे कसतील तरीही चालतील कोणत्याही मातीच्या पात्रांमध्ये आपण थोडंस जल घ्या, पाणी घ्या आपल्या घरातलं त्यामध्ये चिमूटभर काळे मिठ टाका. हे काळे तीळ किराणा मालाच्या दुकानांमध्ये किंवा अगदी कोणत्याही पूजेच्या दुकानात तुम्हाला सहज मिळून जाईल.

कुशा नावाची 1 वनस्पती आहे ते एक प्रकारचे गवत आहे. तर कुशा नावाच थोडसं गवत आणि जव त्यामध्ये टाकून आपण हे मातीचे दिवे तीन या संख्या तीन मातीचे दिवे या कोणत्याही झाडाखाली किंवा सर्वच्या सर्व झाडाखाली ठेवून या आणि त्या ठिकाणी प्रार्थना करा की, आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती लाभू दे. पितृदेवांना ही प्रार्थना करायचे आहे. मित्रांनो शनिश्र्चरी अमावस्येस केलेला हा छोटासा उपाय आपल्या कुंडलीतील मोठ्यात मोठा शनि दोष, पितृ दोष दूर करण्यास सक्षम आहे.

या शनिश्र्चरी अमावस्येस आपण पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन त्याची जी मूळ असतात त्या मुळांमध्ये थोडंस जल, एका छोट्या लोट्यामध्ये तांब्यामध्ये जल घेऊन जा आणि हे जल अर्पण करा. खर तर आपण एका तांब्याभर जल घ्यावं त्यामध्ये गाईचं दोन चमचे कच्चा दूध टाकाव,थोडेसे काळे तीळ टाकावेत आणि आपल्या पितरांना शांती लाभावी अशी प्रार्थना करतात हे जल आपण पिंपळाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. ओम पितृ देवताभ्यो नमः या मंत्राचा आपण तिथे जप करू शकता.

यामुळे आपले पित्र आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती लाभते आणि पितरांच्या कृपेने घराची, वस्तूची भरभराट होते. शनिश्र्चरी अमावस्याच्या सायंकाळी आपण पिंपळाजवळ पिंपळाखाली एक दिवा सुद्धा प्रज्वलित करू शकता. या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि थोडेसे काळे उडीद आपण नक्की टाकावेत. सोबतच 1 दिवा आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर सुध्दा आपण नक्की लावा.

जो आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे त्याच्या शेजारी आपण लावायचा आहे. हा दिवा मोहरीच्या तेलाचा असेल आणि कोणत्याही प्रकारचे दिवे लावताना दिव्याखाली आसन महत्त्वाचा आहे. कोणत्याही झाडाची पानं किंवा फुलांच्या पाकळ्या या दिव्याखाली आपण आसन म्हणून नक्की ठेवाव्यात. आणि ते शक्य नसेल तर कोणतीही वाटी, प्लेट, डिश आपण त्याखाली नक्की ठेवावी जेणे करून दिवा पूर्ण होतो. आसन नसलेला दिवा अपूर्ण मानण्यात आलेला आहे.

मित्रांनो आपल्या घरात देवघरात आपण जो दिवा लावणार आहोत त्या दिव्यांमध्ये सुद्धा आपली इच्छा असेल तर पिवळ्या मोहरीचे काही दाणे आपण नक्की टाकावेत आणि हा दिवा प्रज्वलित करावा. शनिश्र्चरीअमावस्या आहे आणि अमावस्येच्या निमित्ताने भगवान श्रीहरी श्रीविष्णूंची असीम कृपा आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर बरसो याच मनोकमनेसह धन्यवाद.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *