नमस्कार मित्रांनो,
30 नोव्हेंबर मंगळवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे उत्पत्ती एकादशी. एकादशीच व्रत सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ मानलं जातं. एकादशी तिथी भगवान श्रीहरी श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच आपण एकादशीचे व्रत, एकादशीचे उपवास हा नक्की करावा. आज आपण उत्पत्ती एकादशीच्या दिवशी करावयाचे काही अत्यंत प्रभावशाली उपाय पाहणार आहोत.
असे उपाय की, ज्यामुळे आपल्या घरात भगवान श्रीहरी श्री विष्णुंच्या कृपेने धन धान्य समृद्धी आणि सुख समाधान शांतता नक्की नांदेल. आणि हो ज्याठिकाणी भगवान श्रीहरी श्रीविष्णू वास करतात त्या घरात माता लक्ष्मी सुद्धा नक्की येते आणि लक्ष्मीचा स्थायी अखंड वास नक्की निर्माण होतो. जाणून घेऊयात की, उत्पत्ति एकादशीच्या दिवशी आपण कोणते उपाय करावेत?
मित्रांनो हे उपाय ज्यांनी व्रत उपवास केलेला आहे धरलेला आहे असे लोकही करू शकतात आणि ज्यांना व्रत उपवास करणं शक्य नाही अशानी सुद्धा हे उपाय केले तरीही चालेल. यातील पहिला सर्वात सोपा उपाय दानधर्म. या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी जे कोण गरीब व गरजू लोक आहेत अशा लोकांना आपल्या सामर्थ्यानुसार क्षमतेनुसार आपण पिवळ्या रंगाची फळे, पिवळ्या रंगाचे धान्य, पिवळ्या रंगाच्या वस्त्रांच म्हणजे कपड्यांच धन अवश्य करा.
या गोरगरिबांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील मोठ्यात मोठ्या समस्या अडचणी आणि संकटे नक्की दूर होतील. मित्रांनो एकादशी आहे आणि एकादशी तिथी म्हटलं की, भगवान श्रीहरी श्रीविष्णूंची आपण अगदी विधिवत पूर्ण श्रद्धेने पूजा करतो. जर आपल्या घरात गरिबी असेल, दरिद्रता असेल तर भगवान श्रीहरी श्रीविष्णुंसोबत आपण या एकादशीस माता लक्ष्मीचीही पूजा करा. या दोघांच्या पूजेमध्ये त्यांना ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या त्यांना नक्की अर्पण करा.
जस की, भगवान श्रीहरी श्रीविष्णूंना पिवळ्या रंगाची फुले आवडतात तर माता लक्ष्मीस लाल रंगाची फुले अतिप्रिय आहे. त्यांच्या रंगाची फुले त्यांना अर्पण करा. भगवान श्रीहरी श्रीविष्णूंना नैवेद्य अर्पण केल्यानंतर दाखवल्यानंतर त्यावर तुळशीची एक किंवा दोन पाने पालथी घालण्यास विसरू नका. जेणेकरून भगवंत तो भोग तो नैवेद्य नक्की ग्रहण करतील आणि माता लक्ष्मीला खीर असेल किंवा शीरा असेल हे पदार्थ अतिप्रय असतात.
आपण त्यांच्या नैवेद्य माता लक्ष्मीस दाखवू शकता आणि ही खीर बनवताना त्यामध्ये थोडेसे केशर किंवा विलायची यांचा वापर सुद्धा आपण आवर्जून करा. मित्रांनो या दिवशी या दोन्ही देवतांची पूजा करताना भगवान श्रीहरी श्रीविष्णूंचा अत्यंत प्रिय मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा आपण कमीत कमी 108 वेळा जप नक्की करा. आणि माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्रांचा मग ओम महालक्ष्मीय नमः ओम महालक्ष्मीय नमः किंवा ओम श्रीम नमः ओम श्रीम नमः किंवा ओम श्रीम श्रीये नमः यापैकी कोणत्याही मंत्रांचा आपण जास्तीत जास्त वेळा जप करा.
ज्यांच्या घरात दक्षिणावर्ती शंख असेल अशा लोकांनी या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी दक्षिणावर्ती शंखच जर पूजन केलं तर ते ही अत्यंत शुभ मानण्यात आलेला आहे. या दिवशी आपल्या अंगणामध्ये जी तूळस आपण स्थापित केलेली आहे ही तुळस सुद्धा प्रत्यक्ष माता लक्ष्मीच रूप आहे ती माता लक्ष्मी स्वरूप आहे आणि हरिप्रिया म्हणजेच विष्णुप्रिया आहे. भगवान श्रीहरी विष्णूंना ती अत्यंत प्रिय आहे. या तुळशीचे सुद्धा आपण मनोभावे पूजा करा.
आणि ही पूजा करत असताना एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा नक्की प्रज्वलित करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा माता तुळशीसमोर उभा राहून आपण जास्तीत जास्त वेळा जप करा. घरात सुख समृद्धी समाधान नक्की नांदत. आणि हो पूजन केल्यानंतर माता तुळशीच्या 11 प्रदक्षिणा म्हणजेच परिक्रमा घालण्यास सुद्धा विसरू नका. जर तुमच्या घराच्या जवळपास जागा नाहीये किंवा प्रदक्षिणा घालण्यास पुरेशी स्पेस नाही जागा नाही तर अशा वेळी आपण स्वतः भोवती सुद्धा या प्रदक्षिणा घालू शकता.
मित्रांनो एकादशी आहे आणि आपलं भाग्य प्रबळ बनवण्यासाठी या दिवशी स्त्रिया महिला काही विशेष उपाय करू शकता. जसे की, ज्या सौभाग्यवती स्त्रिया असतात, ज्या सुहागणीच्या स्त्रिया असतात अशा 7 किंवा 9 स्त्रियांना आपल्या घरी आमंत्रित करावं. त्यांना फलाहार करावाव म्हणजे फळे खाण्यास द्यावी आणि मग ते सौभाग्यच लेणं आहे सौभाग्य सामग्री आहे त्याचं दान आपण या सौभाग्यवती महिलांना करू शकतात त्यामुळे सौभाग्य अखंडित राहत आणि घराची बरकत म्हणजे भरभराट सुद्धा होते.
ज्यांना शक्य आहे त्यांनी या उत्पत्ती एकादशीच व्रत करताना जर निर्जला प्रकारे म्हणजे निर्जला व्रत केलं म्हणजे पाण्याचा एक थेंबही न घेता हे व्रत करतात मात्र ते थोडस कठीण आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी हे व्रत नक्की करा आणि दुसर्या दिवशीच्या द्वादशीला आपण या व्रताचा समापन करू शकता. मित्रांनो या दिवशी भगवान श्रीहरी श्रीविष्णूंच्या मंदिरात किंवा लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात आपण नक्की जावं आणि त्या ठिकाणी जाऊन पिवळ्या पुष्पांची माळा म्हणजे पिवळ्या रंगाच्या फुलांची माळ आपण भगवान श्रीहरी श्रीविष्णूंना नक्की अर्पण करावी घालावी त्यामुळे सुद्धा भगवंत हे नक्की प्रसन्न होतात.
मित्रांनो उत्पत्ती एकादशी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीचे व्रत जी व्यक्ती मनोभावे करते, पूर्ण श्रद्धेने करते तिला मोक्षाची प्राप्ती होते अस हिंदु धर्मशास्त्रात वर्णन आहे. प्रत्येकी एकादस ही कल्याणकारी असते जो कोणी या एकादशीचे व्रत करतो, उपवास करतो त्याचं नक्की कल्याण होतं आणि जर तुम्हाला यापैकी कोणतेही उपाय करणं शक्य झालं नाही तर कमीत कमी आपण या उत्पत्ती एकादशीस भगवान श्रीहरी श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करा केवळ हा एकच उपाय आपल्या जीवनात सुख समृद्धी निर्माण करण्यास सक्षम आहे.
ज्याच्या मनात कोणत्याही प्रकारच्या इच्छा आहेत मनोकामना आहेत त्याच्या अनेक वर्षांपासून अपूर्ण आहेत तर भगवान श्रीहरी श्रीविष्णूंच्या आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यानंतर आपली ही इच्छा जी आहे ही इच्छा ही मनोकामना आपण भगवंतांकडे नक्की व्यक्त करा. ते पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करा. या संपूर्ण जगाचे या विश्वाचे पालनहार भगवान श्रीहरी विष्णू आहेत. आपली इच्छा ही मनोकामना नक्की पूर्ण करतील. मात्र हो एकादशी आहे आणि म्हणूनच कोणत्याही गोरगरीबाचा किंवा कोणत्याही जेष्ठ आपल्यापेक्षा वयाने किंवा नात्याने जेष्ठ असणाऱ्या व्यक्तींचा अपमान यादिवशी चुकूनही करू नका.
आपल्या घरातील जी लक्ष्मी आहे, जी आपल्या घरातील स्त्री आहे मग बहीण असेल आणि आई असेल, मुलगी असेल, पत्नी असेल कोणत्याही स्त्रीचा या दिवशी अपमान करू नका. लक्ष्मी रुष्ट होते आणि घर सोडून निघून जाते. याचा अत्यंत वाईट अनुभव अगदी पदोपदी अनेक लोकांना आलेला आहे. ज्या ठिकाणी स्त्रीचा आदर होतो स्त्रीची पूजा होते त्याच ठिकाणी माता लक्ष्मी वास करते हे नेहमी लक्षात ठेवा. अनेक लोक विचारतात आम्ही अनेक उपाय केले फरक पडत नाही.
लक्षात ठेवा ज्या ठिकाणी नारीची पूजा होते स्त्रीची पूजा होते त्याच घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि म्हणून एकादशी आहे कमीत कमी या दिवशी तरी आपल्या तोंडून कुणाचाही अपमान होणार नाही कुणाबद्दलही वाईट शब्द बोले जाणार नाहीत याची खबरदारी आपण घ्या. आपल्या दारात जो कोणी भिक्षुक येईल त्याचा अपमान न करता त्याला थोडं फार आपल्या समार्थ्यानुसार दान हे नक्की करा. त्यामुळे सुद्धा त्यांचे आ शि र्वा द आपल्याला प्राप्त होतात.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.