29 जानेवारीपासून या राशींना येणार अच्छे दिन

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो 29 जानेवारी रोजी बौद्धिक सुख, वैवाहिक सुख, विलास, कीर्ती, कला, प्रतिभा, सौंदर्य इत्यादींचा कारक शुक्र ग्रह वक्री अवस्थेतून मार्गस्थ होईल. शुक्र हा वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी आहे आणि मीन ही शुक्राची उच्च राशी आहे.

कन्या ही शुक्राची नीच राशी मानली जाते. शुक्र मार्गस्थ झाल्यामुळे काही राशींवर त्याचा अनुकूल परिणाम दिसून येणार आहे. शुक्र अशुभ असेल तेव्हा देवी लक्ष्मीचा ही विशेष आ शी र्वा द मिळतो. चला जाणून घेऊया शुक्र मार्गस्थ झाल्यामुळे कोणत्या राशीच्या लोकांचा भाग्योदय होणार आहे.

1) मिथुन राशी – शुक्र मार्गी झाल्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना ते लाभदायक ठरणार आहे या दरम्यान मानसन्मानात वृद्धी होईल. तसेच कुटुंबीयांसोबत तुम्ही चांगला वेळ घालवू शकाल.

याशिवाय तुमच्या जोडीदारासोबतही तुमचे संबंध अधिक चांगले होतील. गोचर काळात तुमच्या समस्यांचे निराकरण होईल. आरोग्याशी संबंधित समस्या ही कमी होतील आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.

2) सिंह राशी – शुक्र मार्गस्थ होण्याचा काळ तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. या दरम्यान तुम्हाला भूमी किंवा वाहन खरेदीचा योगही संभवतो. जमिनीचा व्यवहार केल्यास त्याचा चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे.

धार्मिक कामांचाही तुम्ही भाग बनाल. जोडीदाराच्या मदतीने तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. वैवाहिक जीवनही सुखद होई. त्यानंतर शुक्राच्या या गोचरामुळे कन्या राशीवर सुद्धा परिणाम होणार आहे. शुक्र मार्गस्थ झाल्याने तुमच्या आयुष्यात आनंदाचे वातावरण येईल.

या दरम्यान भाऊ बहिणीचं नातं अधिक दृढ होईल. येणाऱ्या समस्यांचा सामनाही अतिशय चांगल्यारीतीने कराल. धनासंबंधित समस्यांपासूनही मुक्ती मिळेल. कुटुंबियांसोबतही चांगला वेळ घालवाल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यासाठी हा काळ उत्तम ठरू शकतो.

3) धनु राशी – हा काळ तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. या दरम्यान तुम्हाला गुप्त शत्रूपासून मुक्ती मिळेल. याशिवाय तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिक कष्ट करावे लागतील. परंतु त्याचं फळही तुम्हाला चांगलंच मिळेल.

जोडीदाराच्या सोबतही तुम्ही चांगला वेळ घालवाल. धन लाभाचे योगही संभवतात. याशिवाय कुटुंबीयांचीही मदत मिळेल. तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना शुक्र ग्रहाच्या परिवर्तनामुळे लाभ होणार आहे.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *