नमस्कार मित्रांनो,
28 ऑक्टोबर गुरूवारच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे. गुरुपुष्यामृत योग म्हणजे सगळ्यात मोठा योग्य या दिवसाला मानले जाते. या दिवशी बरेच लोकं सोनं, चांदी खरेदी करतात किंवा जमिनी खरेदी करतात म्हणजे जे ही किमती वस्तू असतात त्याची खरीदारी केली जाते.
अशी मान्यता आहे की, या दिवशी जी ही वस्तू आपण खरेदी करतो ती परत आपल्याकडून जाणार नाही. सोनं खरेदी केले, चांदी खरेदी केलं तर आपल्यावर अशी वेळ येणार नाही की, ते आपण परत विकू शकू. म्हणून या दिवसाची अशी मान्यता आहे की, या दिवशी हा लक्ष्मीचा योग जुळून येतो.
म्हणून मित्रांनो हा गुरूंचा योग म्हणून या दिवशी तुम्ही देवघरात ही एक वस्तू ठेवून त्या वस्तूचे पूजन केल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो. घरात लक्ष्मी येते घरात सुख-समृद्धी नांदते. आणि मग घरात कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही. मित्रांनो 28 ऑक्टोबर या दिवशी तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी ज्याही वेळेस तुम्हाला वेळ असेल त्या वेळेस तुम्ही देवघरात ही वस्तू ठेऊन त्या वस्तूचे पूजन नक्की करा.
ही वस्तू म्हणजेच श्री यंत्र. जे लक्ष्मीची यंत्र म्हणून सुद्धा ओळखले जाते. ते यंत्र जर तुमच्या देवघरात असेल तर तुम्ही त्यांचीच पूजा करायची आहे. जर देवघरात नसेल तिजोरीत असेल तर तिजोरीतून काढून त्याचे पूजन तुम्हाला करायचे आहे. आणि तुमच्या घरात श्री यंत्र नसेल तर तुम्हाला एक नवीन श्री यंत्र घ्यायचे आहे आणि त्याचे पूजन तुम्हाला करायचा आहे.
श्री यंत्राची पूजन करण्याची सोपी पद्धत आहे. सगळ्यात आधी श्री यंत्राला ते देवघरात असेल, तिजोरीत असेल किंवा नवीन आणला असेल त्याला तुम्ही स्वच्छ पाण्याने स्वच्छ करून घ्या धुवून घ्या. त्यानंतर श्री यंत्राला देवघरात स्थापन करा. हळद-कुंकू अक्षता टाकून त्याचे पूजन करा. अगरबत्ती, दिवा ओवाळा त्यानंतर प्रार्थना करा.
लक्ष्मी मातेला प्रार्थना करा की, आमच्या घरात सुख समृद्धी नांदू दे, आमच्या घरात शांतता आरोग्य नांदू दे, आमच्या घरात बरकत राहू दे आणि आम्हाला आशीर्वाद दे, आमच्यावर कृपा कर अशी प्रार्थना करायचे आहे. बस एवढं तुम्हाला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी म्हणजेच 28 ऑक्टोबर गुरुवारच्या दिवशी करायचा आहे तर मित्रांनो श्री यंत्र देवघरात ठेवून त्या श्री यंत्राचे पूजन नक्की करा.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.