23 नोव्हेंबर मंगळवार मोठी अंगारक चतुर्थी अशी करा गणपतीची सिंदूर पूजा सर्व विघ्न दूर होतील.

नमस्कार मित्रांनो,

23 नोव्हेंबर मंगळवार मोठी अंगारकी चतुर्थी अशी करा गणपतीची सिंदूर पूजा सर्व इच्छा पूर्ण होतील. मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल की, गणपती बाप्पाला सिंदूर अत्यंत प्रिय आहे. म्हणून गणपतीची सिंदूर पूजा केली जाते. खास करून अंगारक चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी किंवा गणपती बाप्पाचे विशेष दिवस असतात.

गणपती बसतात त्या वेळेस सुद्धा सिंदूर पूजा केली जाते. बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती किंवा माहीत नसते. म्हणून या खास विशेष आणि महत्त्वाच्या दिवशी म्हणजे 23 नोव्हेंबर मंगळवारच्या दिवशी ज्या दिवशी अंगारक चतुर्थी आहे जिला मंगळी चतुर्थी देखील म्हणतात. ही सगळ्यात मोठी चतुर्थी मानली जाते.

म्हणून या दिवशी तुम्हाला जमत असेल आणि करायची इच्छा असेल तर तुम्ही सिंदूर पूजा करून गणपती बाप्पाला प्र स न्न करू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त सिंदूर लागेल. सिंदूर नसेल तर कुंकू घेऊ शकता कुंकू नसेल तर गुलाल घेतला जो की, गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय आहे. तो घेतला तरी चालेल. परंतु पूजा सामग्रीच्या दुकानात गेले आणि तिथे सिंदूर बोलला तर सिंदूर तुम्हाला आरामात मिळेल.

पाच दहा रुपयाच्या सिंदूर घ्यायचा आहे. तर सिंधूर मिळत नसेल तर गुलाल घेतला तरी काही हरकत नाही. सिंदूर, गुलाल, कुंकू जे असेल ते घेऊन देवघरासमोर सकाळी किंवा संध्याकाळी बसायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती एका ताटात, ताटलीत किंवा तामनामध्ये ठेवायचे आहे. तामनात, ताटलीत, ताटात गणपती बाप्पाची मूर्ती ठेवल्यानंतर अगरबत्ती दिवा लावायचा आहे.

आणि एका ताटात किंवा एका वाटीमध्ये तो कुंकू असेल, सिंदूर असेल, गुलाल असेल तो काढून घ्यायचं. काढल्यानंतर तुम्हाला एका मंत्राचा जप 21 वेळेस करायचं आहे. श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः अगदी सोपा मंत्र आहे. तर आता एक वेळेस तुम्ही एका तुमच्या बोटांनी तो सिंदूर असेल, कुंकू असेल, गुलाल असेल उचलायचा आहे 1 चिमूटभर.

चिमूटभर उचलल्यानंतर तुम्हाला तो गुलाल सिंदूर किंवा कुंकू गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकायचं आहे. सिंदूर, कुंकू, गुलाल टाकताना बोलायचं आहे श्री गणेशाय नमः पुन्हा उचलायचं पुन्हा टाकायचा पुन्हा बोलायचं श्रीगणेशाय नमः अस 21 वेळेस श्री गणेशाय नमः बोलायचं आहे आणि 21 चिमूटभर सिंदूर, कुंकू, गुलाल तुम्ही घेतला आहे तो गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकायच आहे.

टाकून झाल्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती तिथेच राहू द्यायची. गणपती बाप्पाला नमस्कार करायचा प्रार्थना करायची आणि गणपती स्तोत्र 1 वेळेस वाचायचं. नित्यसेवा या पोतीमध्ये गणपती स्तोत्र दिलेला आहे. तर गणपती स्तोत्र वाचून झाल्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती त्या ताटातून, तामनातून, ताटलीतून उचलून गणपती बाप्पाच्या जागेवर ठेवून द्यायचं आहे.

कुंकू लागलेलं आहे, सिंदूर लागलेलं आहे किंवा गुलाल लागलेलं आहे काही हरकत नाही. दिवसभर मूर्तीवर तशीच राहू द्यायची आहे. आणि दुसर्‍या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठून गणपतीची पूजा कराल तेव्हा सर्व देव तुम्ही स्नान घालत असाल तेव्हा गणपती बाप्पांचे सुद्धा ती मूर्ती पुसून घ्यायची, स्नान घालायचं जे असेल ते तुम्ही करू शकता. अशा रीतीने 23 नोव्हेंबर अंगारक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपतीची सिंदूर पूजा करू शकता.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *