2 नोव्हेंबर मंगळवार धनत्रयोदशी वाटीत ही 1 वस्तू ठेवा कधीच पैसा कमी पडणार नाही

नमस्कार मित्रांनो,

2 नोव्हेंबर मंगळवारच्या दिवशी धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी वाटीमध्ये ही एक वस्तू ठेवा. तुमच्या घरात पैसा कधीच कमी राहणार नाही. कमी तुम्हाला पडणार नाही. मित्रांनो 2 नोव्हेंबरला धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस आहे. तसे तर 1 नोव्हेंबरपासून दिवाळीची सुरुवात होत आहे.

कारण 1 तारखेला वसुबारस आहे आणि वसुबारसपासून दिवाळीला सुरुवात होते. वसुबारस, धनतेरस आणि लक्ष्मीपूजन असे हे मुख्य आणि खास दिवाळीचे दिवस असतात. त्याचप्रमाणे धनतेरस सुद्धा एक मुख्य तिथी असते. त्या दिवशी आपण पूजा अर्चना करू शकतो, उपाय करू शकतो यासाठी आजचा हा एक उपाय आहे. जो तुम्हाला तुमच्या घरातच करायचा आहे.

यासाठी फक्त 2 गोष्टींची गरज लागणार आहे. तुम्हाला माहीतच असेल की, 1 गोष्ट म्हणजे वाटी आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला 5 तुळशीची पान घ्यायची आहेत. फक्त एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तुळशीची पाने सकाळी तोडून घ्यायची आहेत. कारण उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे.

तर तुम्ही सकाळी 5 तुळशीची पाने तोडून घ्यायची आहेत आणि त्या पानांना स्वच्छ पाण्यात धुऊन ठेवून द्यायचं आहे. आणि संध्याकाळच्या वेळेस देवपूजा करण्याच्या वेळेस 1 वाटी छोटीशी वाटी स्टीलची काचेची कोणतीही ती आपल्या देवघरात ठेवायची किंवा धनतेरसची पूजा तुम्ही करत असाल तर त्या पूजेमध्ये ठेवायची आहे.

वाटी ठेवल्यानंतर त्यामध्ये ते 5 तुळशीची पानं ठेवायची आहेत. त्यानंतर हळदी कुंकू अक्षता टाकून त्या 5 तुळशीच्या पानांचे पूजन करायचे आहे. अगरबत्ती दिवा लावून ओवाळणी करायची. त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आणि तुमची जी दिनचर्याची पूजा असते किंवा धनतेरसची पूजन असेल तर ते पूजन तुम्ही पूर्ण करायचे आहे. आणि ते 5 तुळशीची पाने तिथेच देवघरात राहू द्यायचे आहे.

दुसऱ्या दिवशी 3 नोव्हेंबर या दिवशी सकाळी उठून अंघोळ वगैरे करून देवपूजा करायची आहे. पुन्हा त्या तुळशीच्या पानांचे पूजन करायचे आहे. हळदी कुंकू अक्षता टाकून त्यानंतर अगरबत्ती ओवाळायची आणि नंतर ती 5 तुळशीची पाने तुमच्या घरातच मुख्य ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहे. मुख्य ठिकाण आता कोणते?

मित्रांनो पहिली धान्य असतील आपले तर धान्यांमध्ये तुळशीचे पान टाकायचे आहे. दुसरं आपल्या तिजोरीमध्ये 1 तुळशीचे पान ठेवायचं आहे. त्यानंतर महिलांनी आपल्या पर्समध्ये 1 तुळशीचे पान ठेवायचं आहे आणि पुरुषांनी आपल्या पाकिटात 1 तुळशीचे पान ठेवायचं आहे.

असे आपण मुख्य ठिकाणी तुळशीची पाने ठेवू शकतो. नंतर आपण जेथेंही आपले शिक्षणाचे पुस्तक, शैक्षणिक साहित्य ठेवतो तिथे सुद्धा 1 पान तुम्ही ठेवू शकत किंवा मुलं शिकत असतील तर त्यांच्या दप्तरामध्ये त्यांच्या बॅगमध्ये तुम्ही 1 तुळशीचे पान ठेवू शकता. अशा रीतीने हे पूजन करायचे आहे आणि 5 तुळशीचे पानं तुम्हाला घ्यायची आहेत.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *