नमस्कार मित्रांनो,
दिवाळी म्हटलं की, शॉपिंग आणि शॉपिंग म्हटलं की, धनत्रयोदशी कारण दिवाळीची खरेदी धनत्रयोदशीलाच करणे शुभ असते. पण या खरेदीत जर आपण ही वस्तू खरेदी केले नाही तर तुम्ही काहीच खरेदी केले नाही. या वस्तूंची खरेदी केल्यास घरात स का रा त्म क ऊर्जा व धनाचे आगमन होते. म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तू जरूर खरेदी करा.
चला तर जाणून घेऊयात की, धनत्रयोदशीच्या खरेदीचा व पूजेचा मुहूर्त कोणता आहे ते. यावर्षी धनत्रयोदशी 2 नोव्हेंबरला येत आहे. आणि हा वारही खूप शुभ म्हणजेच मंगळवार आलेला आहे. जो देवी आईचा आवडता वार आहे आणि धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 07:08 मिनिटांपासून ते 08:14 मिनिटांपर्यंतचा आहे.
आपल्या हिंदू संस्कृतीत धनत्रयोदशी म्हणजे यश सुख समृद्धी व वैभवाचा उत्सव समजला जातो. या दिवशी धनाची देवता कुबेर व आयुर्वेदाचे देव धन्वंतरी यांचे पूजन करण्याचे महत्त्व आहे. दिवाळीच्या आधी धनत्रयोदशीच्या दिवशी घरात या वस्तू आणल्यास घरात धनाचे आगमन खूप वेगाने होते. आज मी तुम्हाला हे सांगणार आहे की, धनत्रयोदशीच्या दिवशी कोणती वस्तू खरेदी केल्यास आपल्या घरात स का रा त्म क ऊर्जेचा संचार होईल व आपल्या दारिद्र्याचा नाश होईल.
त्यातील पहिली वस्तू म्हणजे देवी लक्ष्मी व गणपती बाप्पांची प्रतिमा किंवा मूर्ती. धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी देवी व गणपती बाप्पांना घरात आणल्यास घरात धन संपत्तीचे आगमन होते. आणि संपूर्ण वर्षभर घरात धनसंपत्तीची व अन्न धान्याची कमी राहात नाही. म्हणून न चुकता देवी लक्ष्मी व गणपती बाप्पांची मूर्ती या दिवशी जरूर आणावी.
एक मिठाची पुडी घेऊन धनत्रयोदशीच्या दिवशी घरात जरूर आणावी व तिचा वापर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करावा. यातील थोडेसे मीठ पाण्यात टाकून त्या पाण्याने फरशी पुसावी. यामुळे घरातील सर्व नकारात्मकता निघून जाईल आणि घरातील दारिद्र्य कुठल्या कुठे पळून जाईल. हे मीठ थोडे थोडे काचेच्या वाटयांमध्ये ठेवून प्रत्येक रूममध्ये ती वाटी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्रभर ठेवावी आणि दुसर्या दिवशी सकाळी ते सर्व मीठ एकत्र करून पाण्यात टाकावे.
यामुळे तुमच्या घरातील सर्व न का रा त्म क ते मीठ शोषून घेईल व पाण्यात प्रवाहित होऊन जाईल. पुढील वस्तू म्हणजे दक्षिणावर्ती शंख. जर तुमच्या देवघरात शंख नसेल तर या धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिणावर्ती शंख खरेदी करून घरी आणावा व त्याची स्थापना करावी. शंख सुख समृद्धी व शांतीचे प्रतीक आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी शंख घरात आणावा व लक्ष्मी पूजनाच्या वेळी शंख घरात वाजवावा. यामुळे घरात देवी लक्ष्मीचे आगमन खूप वेगाने होते आणि शंखाचा आवाज जितक्या दूर जातो तितक्या अंतरातील जीव जंतू व किटाणूही नष्ट होतात.
देवी लक्ष्मी मातेला शंखध्वनी खूप आवडतो. म्हणून ज्या ठिकाणी नियमितपणे शंख वाजविला जातो तिथून देवी लक्ष्मी कधीही जात नाही. तेथेच वास्तव्य करते. धने म्हणजे धनाचे प्रतिक आहे. म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी आखे धने खरेदी करावेत आणि त्यांचे पूजन करावे. पूजनानंतर दुसऱ्या दिवशी ते धने कुंडीत किंवा अंगणात माती टाकून लावून द्यावे. ते जस जसे बहरतील तस तसे आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन होईल.
धनत्रयोदशी म्हणजे धनांचा देवता कुबेरांचाही दिवस. आणि महाराजांनाच चांदी खूप प्रिय आहे. म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीची भांडी, दागिने किंवा चांदीचे नाणे खरेदी करणे ही खूप शुभ असते. असे मानले जाते की, या दिवशी चांदी खरेदी केल्यास यश, कीर्ती व ऐश्वर्याची प्राप्ती होते. या दिवशी श्री यंत्र लक्ष्मी यंत्र यांची खरेदी करणे ही खूप शुभ असते.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
कोणतेही शुभ यंत्र खरेदी करून त्याची पूजा करून ते तिजोरी ठेवावे. यामुळे धरन आपल्या तिजोरीत वेगाने आकर्षित होईल या दिवशी तांबे पितळही खरेदी करणे शुभ असते जे शक्य असेल ते खरेदी करा धनत्रयोदशीच्या दिवशी एखाद्या सवासनी स्त्रीला किंवा कुमारिकेला मेकअपचे साज शृंगाराचे सामान व वस्त्रे भेट म्हणून देणे खूप शुभ असते. यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरात कायमचे वास्तव्य करते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.