नमस्कार मित्रांनो,
कोजागिरी पौर्णिमा वर्षाची सर्वात मोठी पौर्णिमा या वर्षी 19 ऑक्टोबरला मंगळवारी असणार आहे. कोजागिरी पौर्णिमा मंगळवारी असल्याने तिचे जास्त महत्त्व आहे. असे म्हणतात की, कोजागिरी पौर्णिमेचे व्रत करून श्रीहरी विष्णू व लक्ष्मीचे पूजन करून काजू किसमिस टाकून बनवलेली खीर रात्रभर चंद्रप्रकाशात ठेवून तो नैवेद्य भगवंतांना अर्पण करून आपण स्वतः ग्रहण केला तर आपल्या सर्व प्रकारच्या आरोग्यविषयक तक्रारीपासून आपली सुटका होते.
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री श्रीहरी विष्णू भगवंत अमृताचा वर्षाव करीत राहतात. म्हणून जर आपण या अमृत वर्षावात स्नान केले व या अमृत वर्षावातील खीरचे सेवन केले तर आपल्याला पुत्र प्राप्ती, धन प्राप्ती असे किती तरी आ शी र्वा द प्राप्त होतात. कोजागिरी पोर्णिमेमेला सर्वात मोठी पौर्णिमा मानले जाते. या दिवशी व्रत केले जाते तसेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजनही केले जाते.
या दिवशी आपण जे काही इच्छा व मनोकामना सांगून भगवंतांचे पूजन करतो, आपली ती इच्छा असते ती नक्कीच पूर्ण होते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दिपदानाचेही फार महत्त्व आहे. जे व्यक्ती भगवंतांसमोर मंदिरात, गोशाळेत, तलावावर, नदीवर दीप दान करतात. आपल्या व त्यांच्या सर्व इच्छा मनोकामनाची पूर्तता होते. कळत नकळतपणे केलेल्या सर्व पापांचे क्षालन होते.
कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राचा काही राशींवर खूप चांगला प्रभाव पडणार आहे. चला तर जाणून घेऊयात त्या कोणकोणत्या राशी आहेत त्या. मेष रास – मेष राशीचा हा काळ खूपच भाग्याचा असणार आहे. या दिवशी मेष राशीचा शुभ योग घडून येणार आहे. या राशीच्या व्यक्तींना सनतान सुखाची प्राप्ती होईल. तसेच सप्तम भावात सूर्य नीच राशीत येत असल्याने गृहस्थ जीवनाकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. वृषभ रास – वृषभ राशीच्या व्यक्तींना हा काळ खूप शुभ व सौभाग्याचा असणार आहे.
या राशीच्या व्यक्तींचे प्र त्ये क कार्य विना अडथळ्याचे पूर्ण होईल. श्रीहरी विष्णू भगवंतांचे पूजन करावे, दीपदान करावे तसेच गोमातेचे पूजन करावे. यामुळे आपल्या सर्व इच्छा व मनोकामनांची पूर्तता होईल. मिथुन राशि – मिथुन राशींसाठीही हा काळ खूप शुभ फलदायी सिद्ध होणार आहे. तसेच कर्क रास, कन्या रास, वृश्चिक रास, धनु रास, कुंभ रास आणि मीन रास या सर्व राशींनाही हा काळ खूपच सौभाग्याचा असणार आहे यासाठी यापुढील संपूर्ण काळ हा त्यांच्यासाठी शुभ व लाभदायक सिद्ध होणार आहे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.