नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आज मी तुम्हाला स्वामींच्या भक्ताची कथा सांगणार आहे. स्वामी भक्तांनी स्वामींची ही कथा नक्की ऐकायला हवी. नारायण नावाचा एक मोठा सरकारी अधिकारी होता. तो मनापासून स्वामी भक्ती करीत होता. त्याची पत्नी, आई, मुलगा धार्मिक होते परंतु त्यांची स्वामींवर श्रद्धा नव्हती. स्वामी म्हणजे मनुष्य आहे तो काही देव नाही आणि आपण त्यांना देव म्हणू शकत नाही असे त्यांचे मत होते.
एके दिवशी नारायण स्वामींच्या दर्शनाला येतो. आशीर्वाद घेऊन परतत असताना त्याच्या लक्षात येते स्वामींना भेट म्हणून आणलेली शाल स्वामींना द्यायची राहिली आहे. त्यामुळे तो परत स्वामींकडे जाण्यासाठी निघतो पण त्याला वाटेत गौराबाई भेटतात. आता गौराबाई म्हणजे जणू काही दुसरी सुंदराबाई. बाई म्हणतात तू जा इथून ही शाल स्वामींना मी देते.
गौराबाई नारायणकडून शाल घेतात. पण स्वामींना काही देत नाही. एके दिवशी नारायणला सरकारी कामानिमित्त अपरात्री बाहेरगावी जायचं असत. नारायणची आई आज किंक्रांत आहे म्हणून त्याला जाण्यापासून थांबत असते. तरी नारायण मनात म्हणतो स्वामींच्या सेवकांना नाही कशाची भीती असे म्हणून बाहेर गावी जायला निघतो. अक्कलकोटला तिकडे स्वामी थंडीने कुडकुडत असतात.
समोर शेकोटी असते भुजंग, चोळप्पा स्वामींना घोंगडी आणून देतात परंतु स्वामी ते घोंगडी पांघरून घेत नाही. थोड्या वेळात गौराबाई तिथे येतात तिला राहून स्वामींना नारायण यांनी दिलेल्या शालेबद्दल विचारतात. गौराबाई निमूटपणे स्वामींना शाल आणून देतात. तिकडे नारायणला रस्त्यात दोन चोर अडवतात आणि त्याला मारहाण करून त्याच्याकडून गाठोडी हिसकावून घेतात.
नारायण रक्तबंबाळ होऊन धरतीवर कोसळतो. पण कसाबसा सावरतो आणि स्वामींचा धावा करु लागतो. याठिकाणीच काही अंतरावरून दोन पोलीस जात असतात. तो नारायण त्यांना म्हणतो मला दवाखान्यात न्या मला खूप दुखापत झाली आहे असे सांगतो. त्यावेळी ते पोलीस आम्हाला वेळ नाही असे सांगून पुढे निघून जातात. पुढे गेल्यावर त्यांना एक हिंदू विरुद्ध भेटतो आणि ती सूचना देतो.
तरीही पोलिस आपल्या वाटेने चालत जातात. काही अंतर गेल्यावर त्यांना प्र त्य क्ष स्वामी येऊन ही सूचना देतात. तरीही पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात. पण काही वेळातच स्वामींचे सतेज आणि रुबाब यामुळे पोलिसांना त्यांना नाही म्हणता येत नाही. ते दुखापत झालेल्या नारायणला मदत करायला परत येतात. पाहिल्याबरोबरच पोलीस अधिकारी त्यांना लगेच ओळखतात.
घरी आणून सोडतात आणि वैद्याचा उपचार करण्यात येतो आणि त्यांच्या घरचे म्हणतात स्वामी स्वामी करून काय मिळालं. किंक्रांतीच्या दिवशी नको जाऊ म्हणलं तरी गेला काय केलं स्वामींनी, पण नारायण स्वामींची भक्ती करणे सोडत नाही. काही दिवसांनी तोच पोलीस अधिकारी नारायणचे हालहवाल विचारायला नारायणच्या घरी येतो.
नारायण त्यावेळी त्याला विचारतो तुम्हाला मला दुखापत झाली आहे ही सूचना कोणी दिली. पोलीस म्हणतो आम्हाला एका वृद्ध माणसाने सूचना दिली. नारायण विचार करतो त्या दिवशी अपरात्री आपण रात्रीच्या वेळी ते पण किंक्रांती सामसूम असून आपल्याला कोणी पाहिले असावे. नक्कीच स्वामींनी काहीतरी केले असेल तो आपल्या मुलाकडून स्वामींचे चित्र मागवतो आणि पोलिसांना दाखवतो.
पोलीस अधिकारी म्हणतो हो हेच ते वृद्ध मनुष्य. नारायणला गहिवरून येतं त्याला आणि त्याच्या घरच्यांना सुद्धा कळतं स्वामी कृपेची त्यांना प्रचिती येते. पण तरीही त्यांना प्रश्न पडतो की, स्वामी जवळ होते तर त्यांनी अपघात घडवून का आणला? तेव्हा स्वामी प्रकट होतात स्वामी म्हणतात अरे तुम्हाला काय वाटलं आम्ही मनुष्य आहे म्हणून काही करू शकणार नाही.
भगवंताला कोणत्याही रूपात भक्ताची मदत करायची असते. आम्हाला नियती बदलता येत नाही परंतु त्यातून भक्तांची सुटका कशी करावी याचे धोरण आम्ही ठरवतो. अरे खुद्द प्रभू श्रीरामांना सुद्धा आपला वनवास चुकवता आला नाही. स्वतःच्या कर्माचे फळ असते चुकवता येत नाही.
परंतु त्यातून आपल्या भक्तांना कसे सोडवावे यावर सद्गुरूंचा कायम लक्ष असतो हे ऐकून सर्वांना आपली चूक कळते. सर्वजण स्वामींची क्षमा मागतात आणि नंतर सर्वजण स्वामींचा जय जयकार करतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.