नमस्कार मित्रांनो,
महादेवांचा खूप मोठा दिवस, महादेवांचा अत्यंत प्रिय दिवस तो म्हणजे महाशिवरात्री. आपण बोलतो की, आपल्या स्वामी समर्थांमध्ये सगळ्या देवांची स्वरूप आहेत. सगळे देवळ स्वामी समर्थांमध्ये विराजमान आहेत.
तर आपण या दिवशी स्वामींची सेवा करायला अजिबात विसरायचे नाही. स्वामींचे नामजप स्वामींची आरती स्वामींना नैवेद्य वेळेवर तुम्ही ते करायलाच पाहिजे. आजच्या या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगणार आहे ज्या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही स्वामी समर्थांना दाखवा.
स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील, तुमच्यावर प्रसन्न होतील, तुमच्यावर कृपा करतील, सुख, समृद्धी, यश, संपत्ती आनंद समाधान सगळं काही तुमच्या घरात नांदू लागेल. तुमच्या घरातून अडचणी, दुःख, समस्या, भांडण, कटकटी सगळं काही घरातून निघून जाईल.
महाशिवरात्रीच्या दिवशी श्री स्वामी समर्थांना तुम्हाला या 3 गोष्टी दाखवायच्या आहेत आणि त्यांच्यासमोर ठेवायचा आहेत. या 3 गोष्टी कोणत्या आहेत? तर मित्रांनो या गोष्टी म्हणजेच महादेवांच्या अत्यंत प्रिय वस्तू आहेत. त्या तुम्हाला स्वामी समर्थांना दाखवायचे आहेत.
पहिली गोष्ट पहिली वस्तू ती म्हणजे सफेद फुलांचा हार तुम्हाला करायचा आहे किंवा आणायचा आहे आणि तो स्वामी समर्थांना अर्पण करायचा आहे. हार तुम्हाला मिळत नसेल तर एक दोन किंवा एकच सफेद फुल आणून स्वामींच्यासमोर तुम्हाला ठेवायचे आहे.
त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे दूध. तुम्हाला एका वाटीत दूध घ्यायचे आहे. त्यामध्ये चिमूटभर साखर टाकायचे आहे आणि ते दूध स्वामींच्यासमोर तुम्हाला ठेवायचे आहे. यामध्ये तिसरी महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे सफेद रंगाचे अष्टगंध किंवा सफेद चंदन.
सफेद चंदनाला घासून याचा टिळा स्वामींच्या मस्तकावर तुम्हाला लावायचा आहे. सफेद फुले, दूध आणि सफेद अष्टगंध किंवा सफेद चंदन म्हणजे तिन्ही सफेद रंगाच्या वस्तू आहेत. सफेद म्हणजे पांढऱ्या रंगांच्या वस्तू त्या वस्तू तुम्हाला स्वामींना दाखवायचा आहे.
स्वामी समर्थांच्या समोर ठेवायचे आहे. याने महादेव आणि स्वामी समर्थ तुमच्यावर तुमच्या घरावर प्रसन्न होतील आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील तर मित्रांनो या 3 वस्तू स्वामी समर्थांना नक्की दाखवा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.